मुंबई : आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. हे बघावं लागेल. अडीच वर्षानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) बोलताहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत आज बोलत होते. संजय राऊत म्हणाले, भाजप-शिवसेनेत काय झालं. हे आम्ही बघू. यात तिसऱ्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं बघा. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) काल भारतीय जनता पक्षाचाच लाऊडस्पीकर वाजत होता. भाजपचंच हे स्क्रीप्ट होतं, असं वाटतं. टाळ्याही भाजपच्याच होत्या. त्यावर जास्त न बोललेलंच राज्याच्या हिताचं राहील. मेट्रोचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री (CM) ठाकरे आपलं काम करत आहेत. काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. अशी ऐतिहासिक कार्य मुख्यमंत्र्यांच्या हातून घडत आहेत. बोलायचंच असेल तर त्याच्यावर बोला, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, तुमच्या भोंग्यांचं काय करायचं. त्यांच्या भोंग्यांच काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला, अस म्हणता. अहो त्याच शरद पवारांच्या चरणाशी आपणसुद्धा जात होतात. सल्ला मसलत करायला. कशाकरिता आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं. विशेष म्हणजे कालच्या कार्यक्रमाच्या टाळ्याही स्पान्सर्ड आहेत. जिथं बहुमत निर्माण होतं तिथं सरकार बसतं. खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सरकार बनलंय. काल राज ठाकरे यांनी मराठी भाषा भवनच स्वागत केलं असतं. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा भवन उभं झालं. त्यावर बोलायला हवं होतं. फक्त टीका करायची. टीका करायची, टीका करायची; यानं काय मिळतं, असंही संजय राऊत म्हणाले. नुकतीच टीका करत बसाल तर आहे तेही गमवून बसाल, असा सज्जड दमला मनसेला दिला.
भाजप हे त्यांनी मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढते. हे यातून कालच्या प्रकरणावरून स्पष्ट दिसते, असं संजय राऊतांनी सांगितलं. पण, आम्ही यावर फारशी चर्चा करणार नाही. आमचा दृष्टिकोण विकासाचा आहे. हे राज्य पुढं न्यायचंय. या राज्यात जे संकट येतील त्यांच्याशी लढा द्यायचाय. या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांची घुसखोरी आणि अतिक्रमण सुरू आहे. त्याच्याशी लढा द्यायचाय. हे सर्व करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा आम्हाला फडकावयाचा आहे. भाजप शासित किती राज्यात अजान बंद करण्यात आली. किती मशिदीवरील भोंगे हटविण्यात आलेत. ते बघा सुरुवातीला, असंही राऊत यांनी सुनावलं. राज्यात कायद्यानुसार काम चालते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हा का बोलता, असंही संजय राऊत म्हणाले.