मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Sanjay Raut) शिवसेनेचे खा. संजय राऊत हे (ED Office) ईडीच्या ताब्यात आहेत. (Bell) जामिनासाठी संजय राऊत यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे राऊतांनी दाखल केलेल्या अर्जावर ईडीला 19 सप्टेंबरपर्यंत उत्तर देणे बंधनकारक होते. पण शुक्रवारीच याबाबत ईडीने आपले उत्तर दिले आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढणार का हे देखील पहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे बंधू सुनिल राऊत हे प्रयत्न करीत आहेत. मध्यंतरी ते पक्षप्रमुखांच्याही भेटीला गेले होते.
जामिनासाठी संजय राऊत यांनी अर्ज करताच कोर्टांने याबाबत ईडीचे म्हणणे काय अशी विचारणा केली होती. शिवाय याबाबत 19 सप्टेंबरपर्यंत आपले उत्तर द्यावे अशाही सूचना कोर्टाने दिल्या होत्या. यावर ईडीकडून उत्तर देण्यात आल्याने तुर्तास तरी राऊतांना दिलासा नाहीच असेच चित्र आहे.
संजय राऊत यांच्यावर पहिला कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे जामिनाच्या अर्जानंतर लागलीच प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना जामीन मिळेल असा आशावाद सुनिल राऊत यांना होता. पण आता ईडीनेच विरोध दर्शवल्याने कोर्ट काय भूमिका घेणार हे देखील पहावे लागणार आहे.
31 जुलै 2022 रोजी ईडीने संजय राऊत यांच्या विक्रोळी येथील निवास्थानी धाड टाकली. तब्बल 15 तास चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. दीड महिन्यापासून ते ईडीच्या ताब्यात आहेत. शिवाय आता ईडीने जामिनासाठी विरोध दर्शवला आहे.