जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला. त्यानंतर आता फडणवीसांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांबाबत (Girish Mahajan on Eknath Khadse) स्पष्टीकरण दिलं आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाला, असं गिरीश महाजन (Girish Mahajan on Eknath Khadse) म्हणाले.
“प्रत्येक निवडणुकीत मुक्ताईनगरची लढत ही चुरशीची असते. मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने खडसे पराभूत झाले. सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले, परंतु मुक्ताईनगरची लढत चुरशीची असल्याने पराभव झाला”, असं गिरीश महाजन म्हणाले.
याशिवाय सर्व पक्षांपेक्षा जास्त ओबीसी आमदार भाजपमध्ये आहेत; भाजप हा ओबीसींना प्राधान्य देणारा पक्ष आहे, असंही महाजन म्हणाले. तसंच भाजपमधील एकही आमदार फुटणार नाही, असा दावा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी दोन दिवसापूर्वी भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Khadses attack on Devendra Fadnavis) यांच्यावर थेट हल्लाबोल केला. जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असं एकनाथ खडसे म्हणाले. इतकंच नाही तर भाजपने ओबीसी नेत्यांना डावललं, एकतर त्यांना तिकीट दिलं नाही आणि ज्यांना तिकीट दिलं त्यांना भाजपमधील गटाने पाडलं, असा हल्लाबोल खडसेंनी केला.
भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडले, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसेंनी केला होता.
संबंधित बातम्या
खडसेंचा फडणवीसांवर पहिला थेट हल्ला, ओबीसींना डावलले, पंकजा आणि रोहिणी खडसेंना पाडले
“खडसेंवर अन्याय नाही, त्यांना पक्षाने खूप संधी दिली, मुलीच्या पराभवामुळे ते बोलत आहेत”
Exclusive : बंडखोरी माझ्या रक्तात नाही, नाराजीनाट्यावर पंकजा मुंडे यांची प्रथमच प्रतिक्रिया