मुंबई : ८८ ला राजीव गांधी पंतप्रधान असताना आमच्या वरिष्ठाना मुख्यमंत्रीपद दिलं. 88 ते 90 एकत्र आले. राजकारणाबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बारामतीकरांनी लोकसभा मतदारसंघांनी खासदार केलं. प्रफुल पटेल साहेबांना खासदार केलं. अनेकांना खासदार केलं. त्यावेळेस दुर्दैवाने एक घटना घडली. एक लाट आली आणि त्यामध्ये मी सांगितलं की तुम्ही सेंट्रलमध्ये या. साहेब सेंट्रलमध्ये गेले संरक्षण मंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये सुधाकर नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जबाबदारी दिली. त्याचवेळी महाराष्ट्र पेटला होता. सुधाकर नाईक यांना बदलून महाराष्ट्रात पाठविले. जाती जातीमध्ये अंतर पडलं. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे. त्या महाराष्ट्राला पुन्हा पूर्व परिस्थिती निर्माण करून द्यायची आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
94 ते 95 मध्ये मंत्रिमंडळ आले. दुर्दैवाने 95 ला आपलं सरकार गेलं. भाजप शिवसेनेची युती आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतरच्या काळात 95 ला त्यांनी एकत्र निवडणूक लढल्या. त्यावेळेस काँग्रेस एकत्र होती. परंतु आम्हाला सांगण्यात आले की सोनिया गांधी परदेशी आहेत. परदेशी व्यक्ती या देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही. आपण ऐकलं नव्हतं भुजबळ साहेबांनी पुढाकार घेतला आणि शिवाजी पार्क येथे सभा घेतली.
साडेचार वर्ष आणि त्यावेळेस संपूर्ण मैदान गाजवण्याचे काम भुजबळ साहेबांनी केलं. हा इतिहास आपल्याला आठवत असेल. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला वाटलं होतं मी, आर. आर. पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे काहीतरी समाजाकरता आपण केलं पाहिजे ते करत होतो. आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करत होतो.
राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा त्याचे परिणाम पहिले. सुरवातीला 58 मिळाल्या. काँग्रेसला देशात नेतृत्व होतं. परंतु, राज्यामध्ये एवढा ताकतीचा नेता नसताना आम्ही सगळ्यांनी काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये कामाला सुरुवात केली. जिवाचं रान केलं. त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा बाकीच्यांना महत्त्वाची खाती मिळाली.
जयंत पाटलांना महत्वाचं खात मिळालं. मला कृष्णा खोऱ्याचे फक्त पाच सात जिल्ह्याचे खाते मिळाले. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हा महाराष्ट्र जाणतो. मी कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करून राजकारण केलं नाही. त्याच्यामध्ये कधी अडकलो नाही. पहाटे कामाला सुरुवात करतो. आज देखील करतो. रात्री उशिरापर्यंत काम करतो. हे सगळं कशा करता?
महाराष्ट्रात मी छोटा कार्यकर्ता होतो. विजयसिंग मोहिते पाटील, दिल्लीमध्ये प्रफुल पटेल साहेब हे सगळे प्रमुख नेते होते. त्याच्यामध्ये सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं की सगळ्यात जास्त जागा त्यांच्या आलेल्या आहेत. आता आपल्याला त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल. स्वर्गीय विलासरावजी हयात नाही.
विलासरांनी विचारलं की आता तुमच्यामध्ये मुख्यमंत्री कोण? त्यावेळेस भुजबळ साहेब, आर आर पाटील असे नेते होते. मी किवूनीच नव्हतो. कारण, हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. ते मान्य केले पाहिजे. सगळेच आपल्याला मिळाले पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नये. पण, चार खाती जास्त घेऊन चार मंत्री पद जास्त घेऊन आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं.
2023 मध्ये ही संधी मिळाली असती तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता. आम्ही कोणी कामांमध्ये कमी आहोत का? आम्ही कुठे लोकांमध्ये मिसळायला कमी आहोत का? आम्ही आमच्या बहिणीचा आदर करायला कमी आहोत का? वडील, दादांचा आदर करायला कमी आहोत का?
निवडून आल्यानंतर आमच्या मतदारसंघांमध्ये जनतेची हीच अपेक्षा असते की आमदारांनी आमचे काम करावे. आमच्या आमदारांनी विकास करावा. आमच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढे घेऊन जावं. राज्यातल्या प्रमुखांनी राज्याला पुढे घेऊन जावं आणि तशाच पद्धतीने आजपर्यंत मी काम करत आलो आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मदतीने तुमच्या साथीने या सगळ्या नेतेमंडळींच्या सहकाऱ्यांसोबत उद्या आपल्याला पुढे जायचं आहे.
खासदारकीच्या जागाही आपल्या कमी झाल्या. 2004 ला नऊ, 2009 ला आठ 2014 ला चार, 2019 ला चार. महाराष्ट्रामध्ये आपण 4, 8, 7 यापेक्षा खासदारांच्या पुढे आपण गेलो नाही. बैठकीमध्ये मी तसे बोलून दाखवले. मला मनापासून वाटत होतं की आपला पक्ष वाढला पाहिजे. खासदारांची संख्या वाढली पाहिजे. आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे. नवीन नेतृत्व पुढे आले पाहिजे.
पन्नास वर्षांनी एक पिढी जाते पुन्हा दुसरी येते. 75 वर्षांनी तिसरी पिढी पुढे येते. हे चक्र वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालणार आहे. अशा पद्धतीने सगळं काम करत असताना आम्ही सगळेजण पुढे जात होतो. परंतु, संख्या कमी होत होती. 2004 ची आमदारांची संख्या किती? 2009 ला 62 झाली, 2014 ला 41 झाली, 2019 ला 54 झाली तरीदेखील काही गोष्टी करून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आणण्याचा प्रयत्न झाला.
2014 ला भाजपची सत्ता नव्हती. त्यावेळेस भाजपच्या नेत्यांनी सांगितलं. 16 जागा राष्ट्रवादीला लढवाव्यात. 16 जागा शिवसेना लढवेल. 16 जागा भाजप लढवेल 48, 48 जागा आपण निवडून आणू. परंतु, नंतर भाजपने सांगितले आम्हाला जमणार नाही. कारण अनेकांवर आरोप होते. पण, त्यावेळी वरिष्ठ नेत्यांना शिवसेना सोबत नको होती.
आम्ही पण काम केलं. पण, नेहमीच 71, 62, 58, 41, 54 च्या पुढे आपण गेलो नाही. आता जो निर्णय घेतला तो भाजप, शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमत प्रचंड आहे. हे सगळं करत असताना मंत्रिमंडळामध्ये आता नऊ जणांना संधी मिळाली. संधी मिळणारे वेगवेगळी आणि पालकमंत्री पदे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे.
सरकारमध्ये असल्यावर निवडून आलेल्या आमदारांची कामे करता येतात. सरकार गेल्यानंतर सगळ्या आमदारांच्या विकास कामाला स्थगिती मिळाली. आपल्याला ती स्थगिती उठवायची आहे. वैयक्तिक मुलाच्या स्वार्थाकरता हा निर्णय घेतला नाही. सगळे बसलेले आमदार काही आज उपस्थित राहू शकत नाही. काही दवाखान्यात आहे, काही येऊ शकले नाही, काही तिकडच्या मिटींगला गेलेत. पण, सगळे आमदार आज पण माझ्या संपर्कात आहे असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रमध्ये माझी प्रतिमा एक दबंग देता, एक कडक नेता अशी आहे. स्वतःला पाहिजे तेच करतो असा नेता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पण, मी तसं होऊ देणार नाही. सर्व जाती-धर्माला, माझ्या आदिवासी असतील माझ्या मागासवर्गी बांधव असतील, महिला असतील, तरुण असतील कुणाशीच भेदभाव नाही. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली ती आपल्याला कमी करायची आहे. बेरोजगारी कमी करण्याकरता उद्योग धंद्याला पोषक असे वातावरण करायचे आहे. विरोधी पक्षात बसून ते वातावरण होऊ शकत नाही असे अजित पवार म्हणाले.