NCP: आघाडीतून राष्ट्रवादी बाहेर पडणार का? उद्धव ठाकरेंना सोडणार का? जयंत पाटलांनी ठासून पवारांची भूमिका सांगितली

| Updated on: Jun 23, 2022 | 1:29 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भूमिका माध्यमांसमोर मांडली.

NCP: आघाडीतून राष्ट्रवादी बाहेर पडणार का? उद्धव ठाकरेंना सोडणार का? जयंत पाटलांनी ठासून पवारांची भूमिका सांगितली
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना अडचणीत आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकतं, असंही बोललं जातंय. तिकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्यासोबत 37 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र शिंदे राज्यपालांना देणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अधिक माहितीनुसार दोन तृतीआंश शिवसेना (Shiv Sena) आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हे स्पष्ट झालंय. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे. हे विचारलं जात होतं. यातच आता राष्ट्रवादीनंही भूमिका मांडली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत. ठाकरे यांना आवश्यक ती मदत करणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील नेमकं काय?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्र्वादीची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, महाविकास आघाडी सरकार टीकावं, अशी आमची इच्छा आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवश्यक ती मदत करणार असल्याचं जयंत पाटील माध्यमांना बोलताना म्हणाले. दरम्यान, जे आमदार शिवसेनेतून गेले आहेत. ते आमदार आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असंही पाटील यावेळी म्हणालेत. सरकार टिकावं अशी आमची भूमिका आहे. तर शिवसेनेत अंतर्गत काय चाललंय हे माहीत नाही. सरकार टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही पाटील म्हणालेत.

…तयारी करावी लागत नाही

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, विरोधी बाकावर बसण्याची तयारी करावी लागत नाही. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आमच्या सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांना कोणताही हव्यास नाही. आमची सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकार स्थापन झालं होतं. अडीच वर्षाच्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती. राज्य सरकारनं आणि आम्ही चांगले निर्णय घेतले आहेत, असंही पाटील यावेळी म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. शिंदे यांच्यासोबत 41 आमदार
  2. अपक्ष 6 आमदारांचाही शिंदे यांना पाठिंबा
  3. शिवसेना फोडण्यात यश आल्याचं समोर
  4. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडावी, ही शिंदे गटाची प्रमुख मागणी