ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘गरज पडल्यास मी ही विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढवू शकतो’, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली. ते औरंगाबाद शहरामध्ये पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे यांचे सुपुत्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.
ठाकरे कुटुंबीयांमध्ये सगळ्यात आधी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला सामोरं गेले होते. 2019 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकली देखील. त्यानंतर आता आणखी एक ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.
‘महासंपर्क’ पुनर्बांधणी दौरा । संभाजीनगर
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे ह्यांनी मनविसे पदाधिकाऱ्यांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. #विद्यार्थ्यांचीमनसे #तरुणाईचीमनसे #अमितठाकरे #AmitThackeray pic.twitter.com/CCEYneXiTR
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 14, 2022
अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर होते. मराठवाडा दौऱ्यादरम्यान, औरंगाबादमध्ये असताना त्यांनी स्थानिक पत्रकारांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान, त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींसोबत मनसेच्या रणनितीबाबतही संवाद साधला. शिवाय राजकारणात येण्याच्या निर्णयाबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं.
राज ठाकरे यांचा मी मुलगा नसतो, तर कदाचित मी राजकारणात आलोच नसतो. सध्याची राजकीय स्थिती पाहता मला राजकारण यायची इच्छाच झाली नसती, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत.
अमित ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी दौरे करत असून मनसैनिकांशीही संवाद साधत आहेत. आगामी पालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका या सगळ्यांच्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.