मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक (Brihanmumbai Municipal Corporation Election) जाहीर झाली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या 2022 या निवडणूकीत कोण बाजी मारणार कोण गड राखणार की येथेच राजकारणात थांबाव लागणार हे येणारा काळच ठरवेल. तर आर – दक्षिण प्रभाग म्हणजेच वॉर्ड क्रमांक 24 (WARD 24). तर भाजपसाठी जसा वॉर्ड क्रमांक 23 हा बालेकिल्ला आहे. तसाच वॉर्ड क्रमांक 24 ही भाजपसाठी बालेकिल्ला करण्याचा प्रयत्न सुनीता यादव यांनी केला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपकडून सुनीता यादव (Sunita Yadav from BJP) शिवसेनेकडून प्राजक्ता सावंत, काँग्रेसने पुष्पा संजय झा यांना तर राष्ट्रवादीने आरती पवार यांना उमेदवारी दिली होती. तर मनसे आरती पवार यांना वॉर्ड क्रमांक 24 च्या निवडणूकीसाठी उतरवले होते. पण येथे भाजपच्या उमेदवार सुनीता यादव यांनी बाजी मारली होती. सुनीता यादव यांनी शिवसेनेच्या प्राजक्ता सावंत या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. या मतदारसंघावर विणा यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. 2017 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत काटेकी टक्कर पहायला मिळाली होती. पण या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुनीता यादव या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2017 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर या निवडणूकत वॉर्ड क्रमांक 24 हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
बीएमसी निवडणुका हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख भाग राहिला आहे. मागील बीएमसी निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि भाजप हे नेहमीच सर्वात मोठे पक्ष म्हणून समोर आले आहेत. शिवसेनेने बीएमसी निवडणुकीत नेहमीच सत्ता गाजवली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून पहिले स्थान मिळवले आहे. 2012 च्या बीएमसी निवडणुकीत सेनेने 75 जागा जिंकल्या, 2017 मध्ये, पक्षाला 84 जागा मिळाल्यामुळे संख्या आणखी मोठी झाली. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत, भाजपने 82 जागांसह दुसरे स्थान मिळवले आणि दोन्ही पक्ष युती असल्याने, विजय मोठा होता.
मात्र या वेळी परिस्थिती वेगळी होऊ शकते, कारण शिवसेना आणि भाजप युतीमध्ये एकत्र नाहीत, कारण सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या संघर्षामुळे. शिवसेना हा महाराष्ट्राचा सत्ताधारी पक्ष आहे, आणि त्याची NCP आणि INC सोबत युती आहे. परंतु भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 2022 च्या आगामी BMC निवडणुकीसाठी महाविकास आघाडीशीही फारकत घेतली आहे.
मुंबईची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 इतकी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या ही 80 लाख 3 हजार 236 इतकी आहे. तर 12 लाख 9 हजार 653 एवढी लोकसंख्या अनुसुचित जमातींची आहे. मुंबईत 236 वॉर्ड असून 50 टक्के म्हणजेच 118 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातींसाठी 15 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी 8 जागा या अनुसूचित महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी एक जागा महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर 219 जागा या खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूका आता होत आहेत. त्यासाठी बीएमसी ही तयार आहे. तर यावेळी वॉर्ड क्रमांक 24 हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे मागे सर्वोत्कृष्ट ठरलेल्या नगरसेविका सुनीता यादव याच गड राखणार का हे पहाव लागणार आहे. सुनीता यादव या कांदिवली वॉर्ड क्रमांक 24 दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडूण आल्या आहेत. तर यावेळी हा वॉर्ड सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना हॅटट्रीकची संधी आहे. सुनीता यादव यांनी कोरोनाच्या काळात आपल्या प्रभागात नियमितपणे धान्य वाटप करत होत्या. ठिकठिकाणी शिबिरे आयोजित करत होत्या त्यामुळे जनमानस तयार झाला आहे.
शुद्ध पाणी देण्यासाठी बीएमसी वेळोवेळी दुरुस्तीचे काम करत असते. त्यामुळे काही काळ पाणीपुरवठा खंडित होत असतो. पण कांदिवली येथील नागरिकांसाठी हे सहाचेच झालं आहे. यावेळीही या भागात 31 मे ते 1 जून या कालावधीत बीएमसीने पाणीकपात जाहीर केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या मेन लाइनवर सुरू असलेल्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे ही कपात करण्यात आली आहे.
कांदिवली पूर्व आणि पश्चिमेतील भागांचा समावेश असणाऱ्या आर/दक्षिण विभागात उच्चभ्रू ते झोपडपट्टी परिसराचा समावेश होतो. वाहतूककोंडी, पाण्याचा पुरवठा, रस्त्यांची बिकट स्थिती, नालेसफाईचा अभाव, आरोग्याची समस्या, डासांचा उपद्रव, फेरीवाल्यांची आक्रमणे, रिक्षाचालकांची मुजोरी, सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा, मैदाने, उद्यानांची कमतरता, मोकळ्या जागांचा अभाव, फूटपाथवरील अतिक्रमणे, छोट्या गल्ल्यांमधील गटारे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची अनास्था आदी अनेक समस्या येथे आढळतात.
आर-दक्षिण या विभागातील कांदिवली पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला रिक्षाचालकांची अरेरावी आणि बेशिस्तपणा अनुभवास येतो. कांदिवली पूर्व भागात शेअर रिक्षा चालवल्या जातात, मात्र या ठिकाणी रिक्षाचालकांची एवढी दादागिरी असते की, प्रवाशांना नक्की कुठे रांग लावायची आणि कुठे रिक्षा पकडायची, असा प्रश्न पडतो. त्यात फेरीवाल्यांनीही रस्त्यावरच पथारी पसरलेली आहे.