2024 मध्ये मुख्यमंत्री होणार का ?, विनोद तावडे यांचं एका वाक्यात उत्तर काय ?

| Updated on: Dec 18, 2023 | 3:06 PM

तीन राज्यातील महाविजयानंतर भाजपाचे सध्या केंद्रातील जबाबदारी पार पाडणारे नेते विनोद तावडे यांनी भाजपाच्या कामगिरीवर भाष्य केले आहे. मोदींची गॅरंटी प्रभावी ठरल्याने हा विजय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपा अखिल भारतीय स्तरावर 2024 च्या निवडणूकी सोबत 2047 स्वातंत्र्याच्या शताब्दीसाठी काम करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

2024 मध्ये मुख्यमंत्री होणार का ?, विनोद तावडे यांचं एका वाक्यात उत्तर काय ?
vinod tawde
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : भाजपाला छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यातील विजयाने मोठं यश मिळालं आहे. या राज्यातील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी लोकांना खरी वाटली आणि कार्यकर्त्यांची मेहनतीने हे शक्य झाले आहे. या राज्यातील विजय हा सर्वांचा विजय आहे. आपण अजूनही शिकत आहोत आणि काम करीत आहे. तुम्हाला अभिमान वाटला पाहीजे की आमचा मराठी माणूस दिल्लीत काम करतोय. सध्या तरी आपण महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाही. सध्या ‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’ अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आपल्या सध्याच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केले आहे.

विनोद तावडे महाराष्ट्रातील राजकारणातून गेली काही वर्षे दिल्लीतील राजकारणात व्यस्त झाले आहेत. पाच राज्यातील विधानसभाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. राजस्थानातील मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी त्यांना पर्यवेक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. पुणे येथे 16 ते 24 डिसेंबर दरम्यान पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला विनोद तावडे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

पक्षाने दिलेले काम करावं लागेल

भाजपाने चार राज्यात नवीन चेहरे दिले आहेत. मध्य प्रदेशात मोहन यादव हे नवीन नाव असले तरी ते अपरिपक्व नाहीत. मोहन यादव तीन टर्मचे आमदार आहेत. मोहन यादव यादव असण्यापेक्षा ते कार्यकर्ते आहेत. प्रस्तापित नाव सोडून ते नाव का आलं असेल असे वाटत असेल. पण पक्षाने दिलेले काम करावं लागेल हे लक्षात असले पाहीजे. पंकजाताई महाराष्ट्रात सक्रीय आहेत आणि केंद्रात देखील त्याचं काम दिसते. महाराष्ट्र पॅटर्न कसेल ते मी ठरवित नाही असेही तावडे यांनी सांगितले.

इंडिया आघाडी राहीलीच नाही

इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे. पंजाब आणि बंगालमध्ये त्यांना जागा देणार नाही असे सांगितले आहे. मग राहील्या कुठे जागा ? कॉंगेसच्या खासदार साहू यांच्यावरील कारवाईनंतर कॉंग्रेसच्या तिजोरीत खडखडाट आहे असे वाटत नाही असेही विनोद तावडे यांनी सांगितले.