आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत : पंतप्रधान मोदी

| Updated on: Jun 14, 2022 | 3:57 PM

एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यित ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत, असेही मोदी म्हणाले.

आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : आषाढात पंढरपूर यात्रा (Ashadi Pandharpur Yatra) आता सुरु होणार आहे, ही यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्रासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यित ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत, असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केलं. पुणे जिल्ह्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलतं होते. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज यांच्यासह वारकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वारकरींना संबोधताना, विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो भास्करा ज्ञानमूर्ती अशा अभंगाच्या पंक्त्यांनी सुरूवात केली. तसेच ते म्हणाले, देहूच्या तीर्थक्षएत्रावर येण्याचं सौभाग्य मिळालं, आणि मी हाच अनुभव घेतो आहे. देहू संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होय. देहूत पांडुरंग नांदतो. देहूत पांडुरंगांचा निवास आहे, आमि प्रत्येक जण भक्तीने ओतपोत संत स्वरुप आहे. म्हणून नागरिक, माता, भगिनींना नमन करतो. काही दिवसांपूर्वी पालखी मार्ग फोर लेन करण्यासाठी उद्घाटन करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल. 350 किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करत या क्षेत्राता विकास होईल.

आपली प्राचीन ओळख

ज्या शिळेवर तुकाराम महाराांनी 13 दिवस तपस्या केली असेल, ती शीळा फक्त शीळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शीळा आहे. या क्षेत्राच पुननिर्माण करण्यासाठी आभार व्यक्त करतो. संताजी जगदाडे यांनाही नमन करतो. तर आषाढात पंढरपूर यात्रा आता सुरु होणार आहे, हा यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यित ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत, असेही मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पिढ्यांनी पीढ्यांना प्रेरणा दिली

तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. जगातील प्राचीन सभ्येततील एक आहोत. याचे श्रेय संत आणि ऋषिंना आहे. भारत शाश्वत आहे, कारण ही संतांची भूमी आहे. प्रत्येकवेळी मार्गदर्शनसाठी इथे सत्परुष जन्माला आले आहेत. संत ज्ञानेश्वर समाधींचे 725 वर्ष आहे. यांच्यामुळेच भारत गतीशील आहे. बहिणाबाईंनी संत तुकारामांना संतांचे कळस म्हटले आहे. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जातोय. त्यावेळी तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी प्रेरणा मिळते. सार्थ अभगं गाथांनी संत परंपरेचे 500 अभंग रचना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

विकास करणे, हाच अंत्योदय

तर संत तुकाराम म्हणत उच्च-नीचचा भेदभाव करणे हे पाप आहे. हा उपदेश तितका उपयुक्त धर्मासाठी तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही आहेच. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतो. त्यातूनच सरकारच्या योजनांचा विना भेदभाव सगळ्यांना मिळतो आहे. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुषअयात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे. वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळअया पिढईला तुकारामांचे अभंग प्रेरणा राहिलेल्या आहेत. म्हणूनच नेती नेती असे म्हटले जाते.

तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली

तसेच यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे वारकरी आहेत. रंजल्या-गांजल्यांसाठी ते अनेक योजना राबवत आहेत. त्यांची खऱ्या अर्थाने सेवा करत असल्याचे म्हटलं आहे. तर वारकरी संप्रदायाचे हे सूत्र ते तंतोतंत पाळत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच आपले पंतप्रधान हे प्रधान सेवक आहेत. ते जनतेची सेवा करत असतात. त्यामुळेच सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हेच वारकऱ्यांचं सूत्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जसे संपूर्ण जग आपलं आहे असे अभंगात म्हटलं आहे तसेच मोदीना अख्या जगाला कोरोना काळात लसीचा पुरवठा केल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. तर तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली. त्यांनी भागवत संप्रदायाची पताका घेऊन संप्रदाय समाज उभा केला. ज्ञानेश्वरांनी पाया रचला आणि तुकाराम महारांजांनी त्यावर कळस रचला. तर तुकोबांचे शब्द हे त्यावेळी इंद्रायणीत बुडवले मात्र आज ते जन-जनाच्या मनात आहेत. त्याच मार्गावर चालण्याचं कामच पंतप्रधान करत आहेत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

चौपदरीकरणाचे काम मोदींमुळे शक्य

यावेळी नितीन महाराज देहूकर यांनी पंतप्रधान मोदी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, मारुतीबाबा कुरेकर महाराज यांचे स्वागत. तसेच ते म्हणाले, तुकाराम महारांजांची अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवण्यात आली. त्यानंतर 13 दिवस अनुष्ठानासाठी बसले होते. त्यावेळी चमत्कार झाल्याचे नितीन महाराज देहूकर म्हणाले. तर तपोनिधी महाराजांनी 1685 साली तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सुरू केला. तपोनिधी महाराज म्हणून इथे आलेला आहात. चौपदरीकरणाचे काम मोदींमुळे शक्य झाल्याचेही नितीन महाराज देहूकर यांनी म्हटले.