पुणे : आज मुंबईत एक नाही तर दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार आहेत. तर, एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा हा BKC मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक उरले आहेत. दसरा मेळाव्याला गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अशातच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी परराज्यातून कार्यकर्ते येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यातून मुंबईच्या बीकेसी मैदानावर निघालेल्या कार्यकर्त्यांना आपण कुठे चाललो आहोत हे माहितीच नसल्याचे समोर आले आहे.
काही कार्यकर्ते बंगाल वरून, काही कार्यकर्ते उत्तर प्रदेश तर काही कार्यकर्ते बिहार येथून येत असल्याचे समोर आले आहे.
एका ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे निघालेले हे सगळे लोक पुण्यात काम करण्यासाठी परराज्यातून आलेले आहेत. हे सर्व मजूर आहेत.
आम्हाला फिरायला मुंबईला चला म्हणून ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं. पण, आम्ही कुठे चाललोय हे माहितच नाही असेही या मजूरांनी सांगीतले.
शिंदे गटाच्या मेळाव्याला गर्दी करण्यासाठी पुण्यातून पर राज्यातील कामगारांना घेऊन घेऊन ट्रॅव्हल्स निघाल्या असल्याचे समजते.