“आदेश बांदेकर यांच्याबाबत मोठा बॉम्ब आमच्याकडे, तो बॉम्ब लवकरच फोडणार”, ठाकरेंच्या खंबीर शिलेदारावर कुणाचा हल्लाबोल? वाचा…

| Updated on: Dec 29, 2022 | 2:27 PM

वरिष्ठ अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्यावरही 'बॉम्ब'वरून हल्लाबोल करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

आदेश बांदेकर यांच्याबाबत मोठा बॉम्ब आमच्याकडे, तो बॉम्ब लवकरच फोडणार, ठाकरेंच्या खंबीर शिलेदारावर कुणाचा हल्लाबोल? वाचा...
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘बॉम्ब’वॉर सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना ‘बॉम्ब’ची भाषा वापरली जात आहे. वरिष्ठ अभिनेते आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यावरही ‘बॉम्ब’वरून हल्लाबोल करण्यात आला आहे. आदेश बांदेकर यांच्याबाबत एक मोठा बॉम्ब आमचाकडे आहे तो लवकर फोडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.

आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या मंदिर ट्रस्टच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

सिद्धिविनायक ट्रस्टला धोके आणि मातोश्रीला खोके, असं काम बांदेकरांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी. आदेश बांदेकर आणि विश्वस्त मंडळ ताबडतोब बरखास्त केलं पाहीजे, अशी मागणी किल्लेदार यांनी केली आहे.

132 कामगारांना पर्मंनट संजीव पाटील या अधिकाऱ्यांनी केलं आणि या सगळ्याचं श्रेय बांदेकर यांनी घेतलं, असा आरोपही यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

आदेश बांदेकर याबाबत एक शब्दही बोलत नाहीत. अजून त्यांचे दोन दिवस उजडत नाहीत. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, असं यशवंत किल्लेदार म्हणालेत.

सिद्धिविनायक मंदीरात सेवेकरी अनेक लोक येत होते. कोरोनाच्या आधी या लोकांचं कार्ड काढून घेतलं. हे लोक निःशुल्क सेवा करत होते. बांदेकर कुठून आलेत. त्यांची ही कसली मुजोरी? आम्ही त्यांना बदनाम करत नाहीत. गैरव्यवहार आदेश बांदेकर आल्यापासूनच होत आहेत.

पैसे मोजण्यासाठी सेवेकरी येतात. त्यांना काढून टाकण्यात आलं. आता बांदेकर काहीही बोलतील की, या लोकांनी काही तरी चुका केल्या म्हणून त्यांना काढलं असेल. पण मग माझा प्रश्न आहे की त्यांनी सगळ्यांना का काढलं?, हा माझा त्यांना सवाल आहे, असं किल्लेदार म्हणालेत.