यवतमाळ | 22 ऑगस्ट 2023 : आधी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं अन् शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रखडला. हा मंत्रिमंडळ विस्तारात झाल्यास आपल्याला संधी मिळेल, असा आशावाद भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना होता. मात्र तोवर अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण तरिही शिवसेना आणि भाजपचे नेते अजूनही वेटिंगवर आहेत. अशात रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही मंत्रिपदावर दावा केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या नेत्यांना मंत्रिपद मिळालं. अजित पवार यांच्यासोबतच्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आमच्या पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही, असं रामदास आठवले म्हणालेत.
अजित पवार, एकनाथ शिंदे यासोबतच्या सगळ्यांना मंत्रिपद मिळालं. पण आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. आमची मागणी आहे की, आम्हालाही मंत्रिपद द्यावं. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद द्यावं म्हणून सांगितलं. मात्र अजित पवार यांचा विस्तार होईल समावेश होईल. हे आम्हाला ही माहिती नव्हतं. पण तरिही आमची मागणी कायम आहे. आरपीआयला मंत्रिपद मिळावं, असं आठवले म्हणाले. शिवाय अजित पवार यांच्या युतीत येण्याने भाजपच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुक संदर्भात आजचा मेळावा आहे. महायुती सोबत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरपीआयला चांगल्या जागा मिळणार आहेत. ज्यावेळी निवडणूक होतील तेव्हा आरपीआयच्या नेत्यांना जनता निवडून देईल, असं आठवले म्हणालेत.
विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘INDIA’हे नाव देणं अत्यंत चुकीचं आहे. आघाडीला इंडिया नाव देऊन लोकांना संभ्रम मध्ये टाकू नये. नितीश कुमार, ममता बॅनर्जी, उध्दव ठाकरे हे पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. शरद पवार हे सुद्धा इच्छूक आहेत. पण लोकांचा विश्वास नरेंद मोदी यांच्यावर आहे. नरेंद मोदी हे जगात पॉप्युलर नेतृत्व आहे. लोकशाहीमध्ये जनता जो कौल देईल हे मान्य आहे. आगामी निवडणुकीतही आम्ही बहुमताने निवडून येऊ, असं रामदास आठवले म्हणालेत.
इस्रोच्या चांद्रयान मोहिमेवर रामदास आठवले यांनी कविता केली आहे. ती त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली.
भारत देशातील सर्व सायंटिस्ट आमची जान
म्हणूनच चंद्रावर सुटणार आहे चांद्रयान
आम्हाला आहे सगळ्या गोष्टींचे भान
म्हणून नरेंद्र मोदी यांनी पाठविले चंद्रावर चांद्रयान