Marathi News Politics Zp election results live nagpur zp result dhule zp result palghar zp result nandurbar zp result washim zp result akola zp result
ZP results Live : जिल्हा परिषद निकाल : 6 पैकी 5 जिल्ह्यात भाजपचा धुव्वा
पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल (ZP election results live ) जाहीर झाले आहेत.
Follow us on
मुंबई : पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल (ZP election results live ) हाती आले आहेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये भाजपविरोधी कौल असल्याचं दिसून येत आहे. कारण सहा जिल्हा परिषदेत धुळे वगळता सर्व ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सत्तेत आल्याचं चित्र आहे. सहा जिल्ह्यांत काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये (ZP Election Results Live) आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
धुळ्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र तिकडे नागपूरमध्ये भाजपचा गड काँग्रेसने उद्ध्वस्त केला आहे. पालघरमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. नंदुराबारमध्ये काँग्रेस आणि भाजपला समसमान 23 जागा मिळाल्या. पण इथे महाविकास आघाडीचा विजय झाला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरला. तर वाशिममध्येही वंचित आघाडीने चांगली कामगिरी केली.
6 जिल्हा परिषदेच्या एकूण 332 जागांपैकी भाजपला 103 जागा मिळाल्या.
6 जिल्हा परिषदेतील चित्र – एकूण जागा – 332
भाजप विजयी – 103
काँग्रेस विजयी – 74
राष्ट्रवादी विजयी -43
शिवसेना विजयी -48
इतर विजयी – 61
पालघर, नंदुरबार, नागपूर, वाशिममध्ये महाविकासआघाडीची सत्ता
पालघर जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर नंदुरबार, नागपूर, वाशिम या जिल्हा परिषदांवरही महाविकासआघाडीला सत्ता मिळवण्यात यश आलं आहे.
6 पैकी पाच जिल्ह्यात भाजपचा धुव्वा
तर धुळ्यात भाजपने जिल्हा परिषदेवर विजय मिळवला आहे. तसेच अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याची चिन्हं आहेत. सहापैंकी पाच ठिकाणी पराभव झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई बुधवत यांची वर्णी लागली आहे. भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्याने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली.
पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार रिंगणात होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात होते. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मतदान झाले. अकोला जिल्हा परिषदेसाठी 277 तर पंचायत समितीसाठी 492 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. जिल्हा परिषदेच्या 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात होते.
जिल्हा परिषद निकाल लाईव्ह
अकोला : एकूण जागा – 53जाहीर झालेले निकाल.
भाजपा – 7
काँग्रेस – 5
शिवसेना – 11
राष्ट्रवादी – 3
माकप –
वंचित – 23
जनविकास आघाडी –
अपक्ष- 4एकूण 53 पैकी 53 जागांचे निकाल जाहीर झाले असून यात वंचित आघाडीवर असून
नागपूर जिल्हा परिषद जिल्हा परिषद एकूण जागा- 58निकाल जाहीर – 58काँग्रेस : 30
राष्ट्रवादी : 10
भाजप : 15
शिवसेना : 01
अपक्ष : 01
शेकाप : 01
धुळे जिल्हा पूर्ण अपडेट निकाल धुळे जिल्हा परिषद निकाल :*एकूण जागा : 56निकाल जाहीर : 56शिवसेना : 4भाजप : 39राष्ट्रवादी : 3अपक्ष : 03काँग्रेस : 7
पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा : 57
निकाल जाहीर : 57
शिवसेना : 18
माकपा: 6
भाजप : 10
राष्ट्रवादी : 15
बविआ : 04
मनसे : 0
अपक्ष : 03
काँग्रेस : 1
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल – एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 55
काँग्रेस 22
भाजपा 23
शिवसेना 7
राष्ट्रवादी 3
अपक्ष
नागपूर जिल्हा परिषद एकूण जागा- 58काँग्रेस-26
राष्ट्रवादी – 12
भाजप -10
शिवसेना -01
अपक्ष– 01
शेकाप- 01
वाशिम : जिल्हा परिषद एकूण जागा -52जाहीर झालेला निकाल-47भाजपा -7
काँग्रेस -8
शिवसेना -6
राष्ट्रवादी -8
माकप –
वंचित -8स्वाभिमानी-1जनविकास आघाडी – 7
आपक्ष-2
अकोला पंचायत समितीवर भारिपने फडकवला झेंडा, अकरा जागा जिंकून मिळवली एकहाती सत्ता
भारिप 11
काँग्रेस 1
अपक्ष 1
सेना 4
भाजप 3
वाशिम : जिल्हा परिषद एकूण जागा -52
जाहीर झालेला निकाल-38
भाजपा -7
काँग्रेस -5
शिवसेना -5
राष्ट्रवादी -5
माकप –
वंचित -7
स्वाभिमानी-1
जनविकास आघाडी – 6
आपक्ष-2
नागपूर जिल्हा परिषद निकाल
काँग्रेस – २०
राष्ट्रवादी – ०७
भाजप – ०७
सेना – ०१
वाशिम : जिल्हा परिषद एकूण जागा -52जाहीर झालेला निकाल-34भाजपा -7
काँग्रेस -5
शिवसेना -3
राष्ट्रवादी -5
माकप –
वंचित -6
जनविकास आघाडी – 6
आपक्ष-2
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल – एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 37
काँग्रेस 15
भाजपा 14
शिवसेना 5
राष्ट्रवादी 3
अपक्ष
वाशिम : जिल्हा परिषद एकूण जागा -52जाहीर झालेला निकाल-32भाजपा -7
काँग्रेस -4
शिवसेना -3
राष्ट्रवादी -4
माकप –
वंचित -6
जनविकास आघाडी – 6
आपक्ष-2
नागपूर जिल्हा परिषद एकूण जागा- 58काँग्रेस-10
राष्ट्रवादी 05
भाजप 06
शिवसेना -01
धुळे जि.प. निवडणुकीत भाजपची बहुमताकडे वाटचाल. आतापर्यंत घोषित 35 जागांमध्ये भाजपला 28 जागा, महाविकास आघाडीला 6, अपक्ष 1,
अद्याप 21 जागांचे निकाल येणे बाकी
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल
एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 29
काँग्रेस 14
भाजपा 8
शिवसेना 4
राष्ट्रवादी 3
अपक्ष
पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा : 57
निकाल जाहीर : 21
शिवसेना : 1
माकपा: 5
भाजप : 05
राष्ट्रवादी : 08
बविआ: 1
मनसे:0
अपक्ष : 01
धुळ्यात भाजप एकहाती विजयाच्या दिशेने, 56 पैकी 28 जागांवर आघाडी, काँग्रेस 2, शिवसेना 2 जागांवर आघाडीवर
अकोला जिल्हा परिषद – एकूण जागा – 53भाजपा – 5
काँग्रेस – 2
शिवसेना – 5
राष्ट्रवादी -1
माकप –
वंचित – 5
जनविकास आघाडी –
आपक्ष- 2
पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा : 57
निकाल जाहीर : 18
शिवसेना : 1
माकपा: 4
भाजप : 03
राष्ट्रवादी : 08
बविआ: 1
मनसे:0
अपक्ष : 01
नागपूर –राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख विजयी, मेटपांजरा सर्कलमधून विजय, जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलिल देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते
नागपूर जिल्हा परिषद
एकूण जागा – 58
निकाल घोषित – 16
काँग्रेस – 9
राष्ट्रवादी – 4
भाजप – 3
शिवसेना – 0
पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा : 57निकाल जाहीर : 14शिवसेना : 1माकपा: 4भाजप : 03राष्ट्रवादी : 05बविआ: 1मनसे:0अपक्ष : 0
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल
एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 24
काँग्रेस 11
भाजपा 6
शिवसेना 4
राष्ट्रवादी 3
अपक्ष
अकोला जिल्हा परिषद निकाल – जाहीर निकाल 10
भाजप 3
सेना 3
भारिप 2
राष्ट्रवादी 1
अपक्ष 1
नागपूर जिल्हयात पुन्हा एकदा बावनकुळे फॅक्टरचा भाजपला मोठा फटका, नागपूर जिल्हा परिषदेतून भाजपची सत्ता निसटण्याच्या स्थितीत, भाजपचा गड असलेल्या धापेवाडा, कोराडीसह पाचगावमध्येही भाजपला फटका, नितीन गडकरी यांच्या मूळ गावातही भाजपला धोबीपछाड
नागपूर जिल्हा परिषद – ५८ जागा
काँग्रेस – ७ विजयी
राष्ट्रवादी – ३ विजयी
भाजप – 1
शिवसेना – 0
वाशिम :अपडेटजिल्हा परिषद एकूण जागा -52जाहीर झालेला निकाल-25भाजपा -5
काँग्रेस -3
शिवसेना -2
राष्ट्रवादी -3
माकप –
वंचित -5
जनविकास आघाडी – 6
आपक्ष-1
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल
एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 20
काँग्रेस 10
भाजपा 6
शिवसेना 4
राष्ट्रवादी 0
अपक्ष
नागपूर जिल्हा परिषद निकाल – चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलल्याने मतदारांची भाजपवर नाराजी कायम, बावनकुळे यांच्या कोराडी या मूळ गावातंही भाजपविरोधी मतदान, कोराडीतून काॅंग्रेसचे नाना कंभाले विजयी
पालघर जिल्हा परिषद निकाल :एकूण जागा : 57निकाल जाहीर : 10शिवसेना : 1माकपा: 4भाजप : 03राष्ट्रवादी : 01काँग्रेस:-बविआ:01मनसे:0अपक्ष : 0
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल
एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 12
काँग्रेस 7
भाजपा 5
शिवसेना 1
राष्ट्रवादी 0
अपक्ष
धुळे जिल्हा परिषद
एकूण जागा – 56
जाहीर निकाल – 14
भाजप – 10
सेना – 3
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी – 0
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल
एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 12
काँग्रेस 7
भाजपा 5
शिवसेना 0
राष्ट्रवादी 0
अपक्ष
नागपूर जिल्हा परिषद – ५८ जागाकाँग्रेस – पाच विजयी
राष्ट्रवादी- तीन विजयी
….आघाडीकाँग्रेस – चार आघाडीवर
राष्ट्रवादी – तीन आघाडीवर
शिवसेना – दोन आघाडीवर
भाजप – चार आघाडीवर
नागपूर — पारडसिंगा जिल्हा परिषद – चंद्रशेखर कोल्हे,राष्ट्रवादी विजयी,पंचायत समिती – पारडसिंगा शेकाप उमेदवार धम्मापाल खोब्रागडे विजयी,लाडगाव – राष्ट्रवादी निलिमा ठाकरे विजयी
नागपूर जिल्हा परिषद निकाल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धक्का, गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी
पालघर – तलासरी एकूण गट – 05भाजप – 01माकप – 04गटनिहाय1 ) उपलाट : अनिल झिरवा (माकप) – विजयी2 ) सुत्रकार : कुऱ्हाडा शेलू (भाजप) – विजयी3) डोंगरी : विजय नवश्या उराडे (माकप) – विजयी4 ) झाई : रामू पागी (माकप) – विजयी5 ) उधवा : अक्षय दवणेकर (माकप) – विजयीतलासरी तालुक्यातील जिल्हा परिषदेत गटात भाजपला धक्का, पूर्वीच्या तीन जागांपैकी फक्त 1 गटात मिळवता आला विजय
पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा : 57
जाहीर : 07शिवसेना : 0
माकपा: 4
भाजप : 02
राष्ट्रवादी : 01
बविआ:01
मनसे:
अपक्ष : 0
पालघर – आतापर्यंत पालघर पंचायत समितीत सेनेचे पाच उमेदवार विजयी तर एक बिनविरोध, Ncp चा एक उमेदवार विजयी
जिल्हा परिषद निकाल वाशिम-
भाजपा 03
काँग्रेस 01
शिवसेना 01
राष्ट्रवादी 01
वंचीत 02
आपक्ष 02