मुंबई : बल्गेरियाची रहिवासी असलेली बाबा वेंगा ही जगातील प्रसिद्ध भविष्यकारांपैकी एक होती. वयाच्या 12व्या वर्षी बाबा वेंगाच्या (Baba Vanga) दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. बाबा वेंगा यांचे ऑगस्ट 1996 मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी 5070 पर्यंत भविष्य वर्तवले होते. बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी अनेक भाकिते केली होती जी खरी ठरली आहेत. आता लवकरच 2024 हे नव वर्ष सुरू होणार आहे. बाबा वेंगा यांनी 2024 बद्दल अनेक धोकादायक भाकिते केली आहेत. 2023 साठी बाबांचे कोणते भाकीत खरे ठरले आणि 2024 साठी त्यांनी काय सांगितले ते जाणून घेऊया.
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार होती. 2023 मध्ये, एक मोठी खगोलीय घटना घडेल आणि पृथ्वीची कक्षा बदलेल. बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये काही विचित्र वैज्ञानिक शोध लागतील. बाबा वेंगाच्या भाकितानुसार काही देश जैविक शस्त्रांनी हल्ला करतील. बाबा वेंगा यांनी 2023 हे वर्ष अंधार आणि शोकांतिकेचे वर्ष म्हणून वर्णन केले आहे. बाबा वेंगाच्या अंदाजानुसार, या वर्षी भारतात अवकाळी पाऊस पडेल आणि अनेक भागात जोरदार वादळे येतील. अशी भविष्यवाणी वर्तवली होती.
भारतासाठी अवकाळी पावसाचे बाबा वेंगा यांचे भाकीत खरे ठरले आहे. यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये भरपूर पाऊस झाला. वर्षांनंतर असा पाऊस या महिन्यांत पाहायला मिळत होता. बाबा वेंगा यांचे सौर वादळाचे भाकीतही खरे ठरले आहे. शास्त्रज्ञांनी सूर्यामध्ये पृथ्वीपेक्षा 20 पट मोठे छिद्र शोधून काढले असून त्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचे घातक परिणामही दिसून आले आहेत.
2024 साठी बाबा वेंगा म्हणतात की चीन लवकरच जगाची महासत्ता बनेल. चीन संपूर्ण जगात आपली ताकद वाढवेल. 2024 मध्ये चीन महासत्ता बनणार आहे. पुढील वर्षी हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि भूकंपामुळे पृथ्वीची स्थिती बिकट होणार आहे. 2024 मध्ये या बदलामुळे पृथ्वीच्या हवामानावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे तापमानात बदल होऊन थंड ठिकाणे गरम होतील आणि उष्ण ठिकाणे थंड होतील. सन 2024 मध्ये हिमनद्या वितळण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेली शहरे पाण्याखाली जातील.
2024 पर्यंत मानवी जीवन अव्यवस्थित होईल. पुढच्या वर्षी निसर्ग आपले राक्षसी रूप दाखवू शकतो. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, युरोपमध्ये खिलाफत राज्य करेल आणि 2043 पर्यंत युरोपमध्ये इस्लामिक खिलाफत पूर्णपणे स्थापित होईल. येत्या वर्षभरात जगभरात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागेल. बाबा वेंगाच्या मते, येत्या काही वर्षांत मानव शुक्र आणि बुधापर्यंत पोहोचेल.
एक दिवस या पृथ्वीवरून जीवसृष्टी नाहीशी होणार हे निश्चित आहे, असे स्वतः शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे इतर ग्रहांवर जीवनाचा शोध सुरूच आहे. अशा परिस्थितीत मानव इतर ग्रहांवर जीवनाचा शोध घेत आहे. लोक तेथे उर्जेचे नवीन स्त्रोत शोधत आहेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)