मुंबई : ज्योतिषांच्या मते नवीन वर्ष काही राशींसाठी खूप खास असणार आहे. नवीन वर्ष काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. असं असलं तरी वर्षाची सुरुवात खूप शुभ व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. ज्यांच्या घरी ज्याच्याघरी लग्नाची मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे वर्ष महत्त्वाचे असणार आहे. काही राशींसाठी 2024 मध्ये विवाह योग जुळून येतोय. वर्षभरात ग्रह-ताऱ्यांची स्थिती बदलणार आहे. अशा स्थितीत 12 राशींवर परिणाम होणार आहे. अशा अनेक राशी आहेत ज्यांना नवीन वर्षात लग्न जूळू शकते. लग्न पत्रिकेत गुरु आणि शुक्र शुभ असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात अशा पाच राशी आहेत ज्यांच्या पत्रिकेत शुक्र आणि गुरू ग्रहांच्या उपस्थितीमुळे विवाहाची (Vivah Yoga) शक्यता निर्माण होईल. यामध्ये मेष, वृषभ, सिंह, धनु आणि मीन यांचा समावेश आहे.
या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगले जाणार आहे. अविवाहित व्यक्तीसाठी नवीन वर्षात विवाह होण्याची दाट शक्यता आहे. मेष राशीचे सनई वाजतील. जोडीदारासोबतचे वैवाहिक संबंध अधिक घट्ट होतील. प्रेमविवाहातही तुम्हाला यश मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष म्हणजेच 2024 चांगले असणार आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचा खूप दिवसांपासून शोध घेत असाल तर नवीन वर्षात तुमचा शोध संपणार आहे. नवीन वर्षात तुमचे लग्न होईल. लग्नानंतर तुम्हा दोघांचा एकमेकांवरचा विश्वास वाढणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष प्रेम संबंधांच्या बाबतीत खूप खास असणार आहे. लग्नाच्या दृष्टिकोनातून नवीन वर्ष म्हणजे 2024 हे शुभ आणि फलदायी असणार आहे. विवाह होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत, मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यांच्या कुटुंबीयांकडून संमती मिळू शकते. शुक्र आणि गुरू बलवान असल्यामुळे विवाहाची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. बॅचलरच्या आयुष्यात अनेक बदल होणार आहेत. कुंडलीत शुक्राच्या मजबूत स्थितीमुळे लग्नाच्या मार्गात जे काही अडथळे येत आहेत ते दूर होतील आणि विवाहाची शक्यता निर्माण होत आहे.
या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ असणार आहे. मीन राशीच्या जातकांचा बृहस्पति बलवान असणार आहे, त्यामुळे नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये लग्न होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आपल्या जोडीदाराशी लग्न करू इच्छितात त्यांना यश मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)