मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने राशीभ्रमण करणारा ग्रह आहे. दर सव्वा दोन दिवसांनी राशीबदल करत असतो. ऑगस्ट महिन्यात चंद्र जवळपास 14 वेळा राशीबदल करणार आहे. त्यामुळे काही शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होणार आहे. 7 ऑगस्टपासून पुढचे सव्वा दोन दिवस अशीच स्थिती असणार आहे. चंद्र ग्रहाने मेष राशीत प्रवेश करताच एक शुभ आणि एक अशुभ योग घडणार आहे.7 ऑगस्टला चंद्र मीन राशीतून मेष राशीत दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत राहु आणि गुरुची साथ मिळणार आहे.
मेष राशीत त्रिग्रही योगासोबत ग्रहण योग, गजकेसरी योग, तर गुरु आणि राहुच्या युतीमुळे चांडाळ योग असणार आहे. 9 ऑगस्टला चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करेल. त्यावेळेस गजकेसरी आणि ग्रहण योग संपुष्टात येईल. पण सव्वा दोन दिवस राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
मेष : या राशीत अत्यंत शुभ असा गजकेसरी योग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळेल. कामाच्या ठिकाणी दिलासादायक वातावरण असेल. वरिष्ठांचा तुमच्या प्रती असलेला रागही या काळात निवळेल. अविवाहित जातकांना काही प्रस्ताव येऊ शकतात. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य असेल. पण योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा.
कर्क : या राशीच्या दशम स्थानात शुभ अशुभ योगांची स्थिती आहे. गजकेसरी योगाचा या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. या काळात व्यक्तिमत्त्वात जबर फरक दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. उद्योगधंद्यात गुंतवणूक करण्यास हा उत्तम काळ असेल. कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील. शेअरबाजारातून अचानक धनलाभ होऊ शकतो.
मकर : या राशीच्या चौथ्या स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना कामात बरेच बदल दिसून येतील. कायदेशीर प्रकरणात यश मिळू शकते. वाहन किंवा घर खरेदीसाठी हा काळ उत्तम राहील. समाजात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुम्ही सांगितलेली कामंही झटपट पूर्ण होतील. त्यामुळे तुमच्यावरचा विश्वासही वाढेल.