Shani Rahu : पुढचे 10 दिवस शनि आणि राहुचा अभद्र योग, या राशींनी जरा सांभाळून

| Updated on: Oct 06, 2023 | 4:50 PM

Astrology 2023 : शनि आणि राहु यांना ज्योतिषशास्त्रात पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे हे ग्रह एकत्र आले की पळता भुई थोडी होते, असं सांगितलं जातं. त्यामुळे हे ग्रहांचा कुठेही योग जुळून आला की त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो.

Shani Rahu : पुढचे 10 दिवस शनि आणि राहुचा अभद्र योग, या राशींनी जरा सांभाळून
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनि आणि राहु यांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. असं शनि हा न्यायदेवता संबोधलं जातं. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकत्र कुठे आले की जातकांची पळता भुई थोडी होते. ग्रह राशींसोबत नक्षत्र गोचरही करत असतात. त्यामुळे राशी आणि नक्षत्र गोचराचा राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. सध्या शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान आहेत. तसेच 15 मार्चपासून राहुच्या शतभिषा नक्षत्रात विराजमान आहेत. या नक्षत्रात शनिदेव 17 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहेत. त्यामुळे पुढचे दहा दिवस तीन राशीच्या जातकांना सांभाळून राहणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर प्रभाव होईल ते…

या राशींवर होईल परिणाम

कर्क : शनिनं शतभिषा नक्षत्रात ठाण मांडलं असल्याने या राशीच्या जातकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. अजून दहा दिवस ही कळ सोसावी लागणार आहे. 17 ऑक्टोबरला शनिदेव नक्षत्र परिवर्तन करतील आणि त्यानंतर थोडा दिलासा मिळेल. पण शनिची अडीचकी सुरु आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो. नोकरदाराना कामाच्या ठिकाणी त्रास होईल.

कन्या : या राशीच्या जातकांनाही शनिची ही स्थिती लाभकारक नाही. आरोग्य विषयक तक्रारींमुळे पुरते हैराण होऊन जाल. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाईट मार्गाने पैसा कमवणाऱ्यांना फटका बसेल. कारण शनिदेवांना अशी स्थिती अजिबात आवडत नाही. तसेच समाजात अपमानाला सामोरं जावं लागू शकतं. नातेवाईकांकडून संबंधात दुरावा निर्माण होईल. वाहन जरा जपून चालवा.

कुंभ : या राशीत सध्या शनिदेव विराजमान आहे. शनिची ही स्वरास आहे. तरी साडेसातीचा फेरा कोणाला चुकलेला नाही. पण राहुच्या नक्षत्रात असल्याने त्रास होईल. भविष्यातील योजनांवर वाईट परिणाम होईल. तसेच कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे विनाकारण होणाऱ्या खर्चाला वेसण घाला. कौटुंबिक स्तरावर वाद होऊ शकतो. तसेच जोडीदाराच्या काही गोष्टी पटणार नाहीत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)