मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ठरावीक कालावधीनुसार ग्रहांचं गोचर होत असतं. कधी वक्री, कधी उदय-अस्त स्थिती, तर कधी कुमार-युवा-वृद्ध स्थितीत ग्रह असतात. म्हणजे ग्रह ठरावीक कालावधी या अवस्थेतून संक्रमण करतात. त्यामुळे ग्रहांच्या अवस्थेचा बारकाईने अभ्यास केला जातो. ग्रह युवा अवस्थेत वेगाने फळं देतात. देवगुरु बृहस्पती 19 जानेवारीपासून युवा अवस्थेत आला आहे. सध्या मेष राशीत असून शक्तिशाली डिग्रीत गोचर करत आहे. ग्रह 12 ते 18 डिग्रीपर्यंत गोचर करत असतो. त्यामुळे गुरुच्या फलश्रूतीचा वेग अधिक असणार आहे. या कालावधीत राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. खासकरून तीन राशीच्या जातकांना या कालावधीत मानसन्मान आणि धनलाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात या राशींबाबत
मेष : गुरु ग्रह याच राशीत युवा अवस्थेत गोचर करत आहे. 30 एप्रिलमध्ये याच राशीत गुरु असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना या कालावधीत चांगल्या बातम्या कानावर पडतील. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. तसेच नशिबाची उत्तम साथ या कालावधीत मिळू शकते. नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल.
धनु : या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. त्यात पंचम स्थानात विराजमान असून युवा अवस्थेत गोचर करत आहे. त्यामुळे बौद्धिक क्षमता या कालावधीत वाढेल. गुरुची पंचम दृष्टी भाग्य आणि नवम दृष्टी लग्न भावावर आहे. यामुळे वकील, ज्योतिष, न्यायाधीक, लेखन क्षेत्रतील जातकांना लाभ मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल.
मीन : या राशीचं स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. युवा अवस्थेतील गुरु धन स्थानात आहे. त्यामुळे या कालावधीत अचानक धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक फरक दिसून येईल. आपले विचार समोरच्या व्यक्तीला पटतील. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित बदल होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)