मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी वेगवेगळा आहे. यामुळे राशीचक्रात बरेच शुभ अशुभ योग घडून येतात. सध्या सूर्य आणि शनि हे दोन्ही ग्रह आपल्या स्वराशीत विराजमान आहेत.पितापुत्र असले तरी या दोन्ही ग्रहांमध्ये शत्रूत्वाचं नातं आहे. त्यामुळे 30 वर्षानंतर अशी स्थिती जुळून आली आहे. सूर्यदेव एका राशीत महिनाभर ठाण मांडल्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. या स्थित्यंतराला संक्रांती असं म्हंटलं जातं. तर शनिदेव अडीच वर्षांसाठी कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे समसप्तक योग तयार झाला आहे. तर देवगुरु बृहस्पतीची पंचम दृष्टी सूर्यावर पडली आहे. तर शनि ग्रहाचा नकारात्मक प्रभाव काही अंशी कमी होऊ शकतो. यामुळे राशीचक्रावर परिणाम होणार आहे. खासकरून पाच राशीच्या जातकांना सांभाळून राहणं गरजेचं आहे.
वृषभ : सूर्य आणि शनि यांची स्थिती पाहता या राशीच्या जातकांनी सांभाळून राहावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी काही लोकांकडून त्रास होऊ शकतो. कौटुंबिक स्तरावर काही कारणास्तव वाद होऊ शकतो. या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. प्रेम प्रकरणात उलथापालथ होऊ शकते.
सिंह : शनिची दृष्टी थेट पडत असल्याने वैयक्तिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. ऐनवेळी पार्टनरने बिझनेसमधून हात काढून घेतल्याने आर्थिक फटका बसू शकतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा.
कन्या : या राशीच्या जातकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपण न केलेल्या चुकांसाठीही भुर्दंड भरावा लागू शकतो. आई वडिलांकडून कामाच्या बाबतीत ऐकावं लागू शकतो. तसेच भावकीच्या वादात नुकसान होऊ शकतं. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
तूळ : पत्नीसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. मुलंही तुमच्या वागणुकीकडे पाठ फिरवू शकतात. एखादी गोष्ट नीट करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरू शकतो. नातेवाईकांकडून ऐन मदतीच्या काळात पाठ फिरवली जाईल. त्यामुळे डोकं शांत ठेवून प्रसंगांना सामोरं जा.
मकर : शनि आणि सूर्याच्या स्थितीमुळे थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे. मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर अडचणींचा सामना करावा लागेल. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. एखादं दुखणं अंगाशी येऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)