30 वर्षानंतर शनिमुळे ‘शश पंचमहापुरुष राजयोग’, मार्च 2025 पर्यंत या राशींना मिळणार साथ

| Updated on: Dec 07, 2024 | 5:24 PM

ज्योतिषशास्त्रात, शनिच्या गोचराकडे बारीक लक्ष लागून असतं. कारण शनिची स्थिती बदलली की राशीचक्रात उलथापालथ होते. तसेच शनिला राशीचक्रात पूर्ण भ्रमण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. असं असताना शनिमुळे शश पंचमहापुरुष राजयोग तयार होत आहे. तीन राशींसाठी हा योग चांगला असणार आहे.

30 वर्षानंतर शनिमुळे शश पंचमहापुरुष राजयोग, मार्च 2025 पर्यंत या राशींना मिळणार साथ
Follow us on

शनिदेवाला राशीचक्रात न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. शनि जातकाला कर्मानुसार फळं देत असतो. तसेच सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह असल्याने एका राशीत अडीच वर्षे राहतो. तसेच राशीचक्र भ्रमण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. आता शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत असून मूळ त्रिकोण स्थितीत आहे. शनि आपल्याच राशीत असल्याने शश नावाचा राजयोग तयार झाला आहे. पंचमहापुरुष राजयोगापैकी एक असल्याने काही जातकांचं भलं होणार आहे. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच कौटुंबिक पातळीवरील अडचणी दूर होतील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि लग्न किंवा चंद्रापासून पहिल्या-चौथ्या-सातव्या किंवा दहाव्या स्थानात तूळ, मकर आणि कुंभ राशीत असेल तेव्हा शश राजयोग पंचमहापुरूष योग तयार होतो. ज्या जातकांच्या कुंडलीत शश राजयोग असतो त्यांना समाजात मानसन्मान मिळतो. तसेच पैशांची कधीच उणीव भारत नाही.

या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

वृषभ : या राशीच्या दशम स्थानात शनिदेव विराजमान आहेत. यामुळे या राशीच्या जातकांना शनिच्या स्थितीमुळे तयार झालेल्या राजयोगाचा लाभ मिळणार आहे. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवं घर, वाहन, संपत्ती किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. करिअर संदर्भात योग्य निर्णय घेता येईल. नोकरी बदलण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. व्यवसायात फायदा झाल्याचं दिसून येईल.

तूळ : या राशीच्या पंचम स्थानात शनिदेव विराजमान आहेत. यामुळे या राशीच्या जातकांना भौतिक सुख अनुभवता येणार आहे. समाजात मान सन्मान मिळेल. तसेच पद आणि प्रतिष्ठाही मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायी असणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.

मकर : या राशीच्या दुसऱ्या स्थानात शनिदेव विराजमान आहेत. म्हणजेच साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. जाता जाता शनिदेव बरंच काही देऊन जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. जीवनात आनंदाचे नवे क्षण येतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा आणि वरिष्ठांची उत्तम साथ मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)