मुंबई : पंचांगानुसार, 14 जानेवारीला सूर्यदेवांनी शनिच्या मकर राशीत प्रवेश केला आहे. या संक्रमणाला संक्रांती असं संबोधलं जातं. त्याचबरोबर मंगळ आणि गुरु परस्पर विरोधी राशींमध्ये विराजमान आहे. गुरु ग्रह मंगळाच्या मेष राशीत, तर मंगळ ग्रह गुरुच्या धनु राशीत विराजमान आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रभावामुळे सूर्याचा प्रभाव मेष राशीवर आला आहे. त्या मंगळ राशीत शुक्र, मंगळ आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 50 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती जुळून आली आहे. त्यामुळे काही राशींना फटका, तर काही राशींना फायदा होणार आहे. या कालावधीत ग्रहांची स्थिती तीन राशींना अनुकूल असणार आहे. आर्थिक कोंडी फोडण्यास यामुळे मदत होऊ शकते. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना अपेक्षित फळ मिळणार ते सविस्तर..
मेष : या राशीच्या करिअर स्थानात सूर्यदेव विराजमान आहे. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ भाग्य स्थानात आहे. तर गुरु याच राशीत ठाण मांडून आहे. आत्मसन्मान असलेला हा ग्रह गतवैभव मिळवून देऊ शकतो. काही दिवसांपासून झालेल्या गच्छतींनंतर पुन्हा एकदा चांगले दिवस येतील. पगारवाढ किंवा पदोन्नती होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठांचा असलेला राग निवळेल.
कर्क : या राशीच्या सप्तम स्थानात सूर्य, मेष राशीतील गुरुची पंचम दृष्टी पैशांच्या स्थानावर आहे. त्यामुळे या स्थितीचा फायदा जातकांना होईल. करिअरमध्ये नवी उंची गाठाल. गेल्या काही दिवसांपासून अतृप्त अशा इच्छा पूर्ण होतील. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात.
तूळ : या राशीच्या जातकांनाही ग्रहांच्या स्थितीचा फायदा होईल. गोचर कुंडलीत सूर्यदेवांचा प्रभाव वैवाहिक जीवनावर राहील. तसेच नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. विदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्या जातकांना एखादी ऑफर मिळू शकते. तसेच देशविदेशात व्यवसायाचं जाळं पसरवू शकता. जमिनीचे वाद संपुष्टात येतील. नवीन जागा खरेदी करू शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)