मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह हा चंद्र असून मंद गतीने गोचर करणारा ग्रह हा शनि आहे. चंद्राला गोचर करण्यासाठी अडीच दिवसांचा, शनिला अडीच वर्षांचा कालावधी लागतो. प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा वेगवेगळा असल्याने त्याचा फरक राशीचक्रावर होतो. शनिला एका राशीत परत येण्यासाठी 30 वर्षांचा काळ लागतो. ग्रहांचं हे गणित पाहता एका राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ अशुभ योग तयार होतात. असाच एक शुभ योग 500 वर्षानंतर घडून आला आहे. 7 ग्रह वेगवेगळ्या राशीत असल्याने केदार योग तयार झाला आहे. या शुभ योगाचा लाभ तीन राशीच्या जाताकंना होणार आहे. या योगामुळे काही कामं झटपट होतील. तसेच किचकट कामात अपेक्षित यश मिळेल.
मेष : या राशीच्या भाग्य स्थानात मंगळ, शुक्र आणि बुध विराजमान आहे. तर सूर्य दहाव्या स्थानात आणि शनि उत्पन्न स्थानात विराजमान आहे. पाच ग्रह प्रगतीच्या स्थानात बसल्याने मजबूत पाठबळ मिळेल. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. उत्पन्नाची नवी स्रोत निर्माण होतील. त्या मिळकतीतून चांगली बचत होईल. त्यामुळे भविष्यातील काही योजना आताच पार पाडू शकाल. एकंदरीत काही इच्छा वेळेआधीच पूर्ण होतील असं चित्र आहे.
मिथुन : या राशीच्या अष्टम स्थानात सूर्य आणि एकादश भावात शनि विराजमान आहे. तर मंगळ, शुक्र आणि बुधही चांगल्या स्थिती आहेत. त्यामुळे मेषप्रमाणे या राशीच्या जातकांनाही उत्तम फळप्राप्ती होईल. थोड्याशा मेहनतीतून चांगलं उत्पन्न मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळेल. काही अतृप्त इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तूळ : बराच कालावधीनंतर या राशीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. समाजात मानसन्मान मिळेल. आपला शब्द लोकं डोक्यावर उचलून धरतील. चित्रपटसृष्टी, मीडिया या प्रसिद्धीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळेल. राजकारणातील व्यक्तींना मोठं पद मिळू शकते. टप्प्याटप्प्यावर धनलाभ होतील. शेअर बाजार, लॉटरीतून अचानक पैसे मिळू शकतात. घरात काही मंगळकार्य पार पडतील. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)