पाच दिवसानंतर शनि आणि चंद्राची अभद्र युती, सव्वा दोन दिवस या राशींना ठरणार अडचणीचे

| Updated on: Dec 12, 2023 | 4:42 PM

राशीचक्रात बऱ्याच घडामोडी घडत असतात. एखाद्या ग्रहाने गोचर केला की त्याचा कमी अधिक प्रमाणात राशीचक्रावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो. अशीच काहीशी अभद्र युती पाच दिवसानंतर होत आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना सांभाळून राहावं लागेल.

पाच दिवसानंतर शनि आणि चंद्राची अभद्र युती, सव्वा दोन दिवस या राशींना ठरणार अडचणीचे
शनि आणि चंद्राच्या युतीमुळे राशीचक्रावर विषयुक्त परिणाम, या राशींच्या अडचणीत सव्वा दोन दिवस होणार वाढ
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि चंद्र हे दोन्ही ग्रह परस्परविरोधी आहे. एक वेगाने गोचर करणारा, तर एक ग्रह धीम्या गतीने गोचर करतो. शनि ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत अवघ्या सव्वा दोन दिवसात भ्रमण करतो. चंद्र आणि शनिचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीला विष योग संबोधलं जातं. त्यामुळे ज्या जातकांच्या राशीत हा योग असतो त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याची प्रचिती जातकांना पदोपदी येते. पण हे दोन्ही ग्रह दर महिन्याला एकमेकांच्या संपर्कात येतात त्यामुळे त्याचा परिणाम सव्वा दोन दिवस भोगावा लागतो. शनि आणि चंद्राच्या युतीमुळे मन आणि डोक्यावर सर्वाधिक परिणाम होतो. मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं.

विष योग कुंभ राशीत शनि स्थित असल्याने होत आहे. चंद्र ग्रह १७ डिसेंबरला दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. तेव्हापासून पुढचे सव्वा दोन दिवस हा प्रभाव असेल. विष योग कुंभ राशीच्या प्रथम, मकर राशीच्या द्वितीय, धनु राशीच्या तृतीय, वृश्चिक राशीच्या चतुर्थ, तूळ राशीच्या पंचम, कन्या राशीच्या षष्टम, सिंह राशीच्या सप्तम, कर्क राशीच्या अष्टम, मिथुन राशीच्या नवम, वृषभ राशीच्या दशम, मेष राशीच्या एकादश आणि मीन राशीच्या द्वादश भावात तयार होत आहे.

या राशीच्या जातकांना बसणार फटका

मिथुन : या राशीच्या नवम स्थानात शनि आणि चंद्राची युती होत आहे. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कर्जाचं ओझं या कालावधीत वाढू शकतं. वैवाहिक जीवनातही काही कारणास्तव वाद होतील. अहंकारातून मोडलेली नाती आणि संकटात फिरवलेली पाठ यामुळे पुरते खचून जाल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

कर्क : या राशीत शनि अष्टम स्थानात असून अडीचकी सुरु आहे. त्यात आता शनिच्या आगमनाने विष योग तयार होणार आहे. त्यामुळे अडीच दिवस त्रासदायक जातील. जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक पातळीवर काही ना काही कारणावरून वाद होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांनी या कालावधीत जरा जपूनच राहिलेलं बरं राहील.

सिंह : या राशीच्या सप्तम भावात शनि आणि चंद्राची युती होत आहे. पत्नीसोबत या कालावधीत वितुष्ट निर्माण होतील. काही वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या धंद्यात मोठा फटका बसू शकतो. जोडीदाराकडून फसवणूक होऊ शकते. प्रेमप्रकरणात मनाविरुद्ध घडामोडी घडतील. त्यामुळे नातं तुटू शकतं. दुसऱ्याच्या ऐकण्यावरून नाती गोती तोडू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)