मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीकडे बारीक नजरेनं पाहिलं जातं. प्रत्येक ग्रह आपल्या स्वभाव धर्मानुसार फळं देत असतो. 12 स्थानात कुठे ना कुठे ग्रहांची चांगली वाईट स्थिती असते. त्यामुळे राशी मंडळावर त्या ग्रहांच्या स्थिती आणि युतीवर फळ सांगितलं जातं. पण इतर ग्रहांची स्थिती कशी यावरही फलश्रुती अवलंबून असते. त्यापैकी एक म्हणजे कुंभ राशीत असलेली सूर्य आणि शनिची युती..सूर्य हे शनिदेवांचे पिता आहेत. मात्र या दोघांमध्ये कधीच पटत नाही. त्यामुळे ज्या राशीत यांची युती होते तेव्हा विपरीत फळं भोगावी लागतात. गेल्या एक महिन्यापासून सूर्य देव शनि महाराजांच्या कुंभ राशीत आहेत. त्याच राशीत शनिदेव अडीच वर्षांसाठी आहेत. त्यामुळे शनि सूर्याची युती चार दिवसांनी तुटणार आहे.
सूर्य आता वर्षभर कुंभ राशीत येणार नाहीत. त्यामुळे शनि सूर्याची युती आता थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये एका महिन्यासाठी होईल. 15 मार्च 2023 रोजी सूर्यदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने मीन राशीत प्रवेश करताच काही राशींना शुभ फळं अनुभवायला मिळतील. पदोन्नती आणि धनलाभाचा योग जुळून येईल.
सूर्यदेव 15 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील. या राशीत सूर्यदेव 14 एप्रिलपर्यंत राहणार आहेत. त्यानंतर मेष राशीत प्रवेश करतील.
वृषभ : या राशीच्या एकादश भावात सूर्यदेव गोचर करणार आहे. हे स्थान आर्थिक लाभ आणि इच्छेशी निगडीत आहे. तसेच या राशीच्या चतुर्थ स्थानाचे स्वामी सुर्यदेव आहेत. 15 मार्चला होणार गोचर या राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. तसेच घर, वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येईल.
वृश्चिक : या राशीच्या पंचम भावात सूर्यदेव गोचर करणार आहेत. हा भाव प्रेम, संतान आणि शिक्षणाशी निगडीत आहे.या काळात चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच वेतनवाढ होण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.
कुंभ : सूर्य गोचराचा कुंभ राशीच्या जातकांनाही फायदा होईल. कारण गोचर केल्यानंतर सूर्याचा या राशीच्या दुसऱ्या स्थानावर प्रभाव असेल. हे स्थान वाणी, कुटुंब आणि बचतीचं मानलं जातं. त्यामुळे चांगल्या सेव्हिंगसह कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव या काळात येऊ शकतो.
मीन : सूर्याच्या गोचरामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. लग्न भावात गोचर होत असल्याने कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल आणि पदोन्नती मिळू शकते. त्यात गुरुची साथ असल्याने विशेष फायदा होईल.