मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचराचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक स्थितीवर ज्योतिषांची बारीक नजर लागून असते. त्यानुसार फलज्योतिष ठरवलं जातं. 5 मे 2023 रोजी चंद्रग्रहण आहे. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 10 मे रोजी ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह रास बदलणार आहे. 10 मे 2023 रोजी कर्क राशीत प्रवेश करेल आणि 1 जुलैपर्यंत या राशीत राहील. मंगळ ग्रह जवळपास 82 दिवस या राशीत राहील त्यानंतर सिंह राशीत प्रस्थान करेल. मंगळाच्या या स्थितीमुळे राशीचक्रातील 7 राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.
मेष : मंगळाचं गोचर मेष राशीला शुभ राहील. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. उद्योग धंद्यात सकारात्मक बदल दिसून येईल. करिअरमधील बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेला भार हलका होईल.
कन्या : मंगळाच्या गोचरामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात वृद्धी आणि कामात यश मिळेल. उद्योग धंद्याचा विस्तार करण्यासाठी योग्य वेळ आहे. खर्च कमी झाल्याने पैशांची बचत होईल. कौटुंबिक कलह दूर झाल्याने मानसिक समाधान लाभेल.
धनु : मंगळ गोचराचा धनु राशीच्या लोकांनाही फायदा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. धनप्राप्तीचे योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघात होण्याची शक्यता आहे.
कुंभ : मंगळाच्या गोचरामुळे खर्चात वाढ होईल पण उत्पन्न वाढल्याने फायदा होईल. समाजात मानसन्मान वाढेल. काही छोटे प्रवास घडण्याची शक्यता राहील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. पदोन्नती आणि पगारवाढ होऊ शकते.
वृश्चिक : मंगळ गोचरामुळे लांबचा प्रवास घडू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. घरात मंगळकार्य किंवा धार्मिक विधी पार पडू शकतो. या राशीवर मंगळाचा अधिपत्य असल्याने फायदा होईल.
मीन : या राशीसाठी मंगळाचं गोचर प्रगतीपथावर नेणारा आहे. विदेशात शिक्षणाची संधी मिळेल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीची नवीन ऑफर या काळात मिळू शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)