मुंबई : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवसाचं आणि सेकंदाचं महत्त्वा सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांचं वर्णन केलं गेलं आहे. त्यापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया हा दिवस 22 एप्रिल 2023 रोजी असणार आहे. या दिवशी खरेदी आणि नव्या कामाची सुरुवात करणं शुभं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मेष राशीत पाच ग्रह एकत्र येणार आहेत. तर वृषभ राशीत दोन ग्रह असणार आहेत. मेष राशीत सूर्य, गुरु, बुध, राहुसोबत यूरेनस ग्रह असणार आहे. या पाच ग्रहांमुळे पंचग्रही योग तयार होत आहे.
दुसरीकडे, वृषभ राशीत शुक्र आणि चंद्र असणार आहे. त्यामुळे काही राशींच्या जातकांना अक्षय्य तृतीया हा दिवस खास असणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या जातकांना फायदा होणार ते..
मेष : या राशीच्या जातकांना अक्षय्य तृतीया हा दिवस खूपच शुभ असणार आहे. कारण या राशीतच पंचग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना ग्रहांचं पाठबळ मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. या दिवशी दान केल्याने कित्येक पटीने फळ प्राप्ती होते.
वृषभ : मेष राशीत पंचग्रही योग असताना या राशीत शुक्र आणि चंद्राची युती होत आहे. त्यामुळे या राशीत कलात्मक राजयोग तयार होत आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा दर्शवत आहे.
कर्क : या राशीच्या जातकांना अक्षय्य तृतीया खूप खास असणार आहे. या राशीच्या दहाव्या स्थानात पंचग्रही योग तयार होत आहे. त्यासोबत एकादश भावात शुक्र ग्रह असणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात थोड्या मेहनतीनेच फळ मिळेल. तसेच नवे आर्थिक स्त्रोत निर्माम होतील. या दिवशी सकारात्मक उर्जा मिळाल्याने भविष्यात फायदा होईल.
सिंह : या राशीच्या पंचम भावात सूर्यदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी अक्षय्य तृतीया हा दिवस खास असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पुन्हा एकदा सुरु होतील. त्याचबरोबर कुटुंबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आलेली मरगळ दूर होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)