मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार दीड वर्षानंतर राहु आणि केतु हे ग्रह राशी बदल करणार आहेत. सध्या केतु आणि मंगळ यांची अभद्र युती तूळ राशीत आहे. मंगळ ग्रहाने 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करताच ही युती झाली आहे. मंगळ आणि केतु हे दोघंही पापग्रह आहे. त्यांची युती त्रासदायक गणली जाते. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येत आहे. पण ही युती आता फक्त 27 दिवस असणार आहे. त्यानंतर ही युती संपुष्टात येणार आहे. कारण केतु वक्री गोचर करत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 30 ऑक्टोबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरपासून काही राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मेष : मंगळ आणि केतुची अभद्र युती मेष राशीच्या जातकांना त्रासदायक आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण या राशीत राहु आणि गुरुची अभद्र युतीही आहे. पण राहु आणि केतुचं गोचर होताच या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करणं फलदायी ठरेल. शारीरिक आणि मानसिक त्रासातून सुटका होईल.
मिथुन : या राशीची आर्थिक अडचण दूर होईल. नवीन व्यवसाय सुरु करू शकता. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. कौटुंबिक संपत्तीतून लाभ मिळू शकतो. कर्जाचा डोंगर हलका होईल. कौटुंबिक स्तरावर आनंद राहील. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. पिकनिकला जाण्याची योजना आखू शकता.
तूळ : नवीन नोकरीची संधी चालून येईल. तसेच पदोन्नतीमुळे नवी कामगिरी हाती पडेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल. उद्योगधंद्यात यश मिळू शकते. तसेच धनलाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतित कराल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तसेच लग्नासाठी घरच्यांकडून होकार मिळण्याची दाट शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)