भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन (Rakshabandhan 2022) लवकरच येत आहे. या वर्षी रक्षाबंधन सणावर मंगळ आणि राहू अशुभ संयोग निर्माण करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि राहू अंगारक योग (Angarak Yog 2022) नावाचा अशुभ योग तयार करत आहेत. अंगारक योग 10 ऑगस्टपर्यंत मेष राशीत (zodiac signs) राहील आणि दुसऱ्या दिवशी 11 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आहे. जेव्हा कुंडलीत राहु अथवा केतु पैकी कुठल्या एका ग्रहा बरोबर मंगळ ग्रहाचा संबंध बनतो त्या कुंडलीत अंगारक योग उत्पन्न होतो. कुंडलीत अंगारक योगाचे अशुभ फळ तेव्हा प्राप्त होतात जेव्हा हा योग निर्माण करणारे मंगळ, राहु, किंवा केतु दोन्ही अशुभ भावात असतील. याच्या अतिरिक्त जर कुंडलीत मंगळ, राहु, किंवा केतु दोन्ही शुभ भावात असतील तर व्यक्तीच्या जीवना वर अधिक नकारात्मक प्रभाव पडत नाही.
अंगारक योग याची ओळख व्यक्तीच्या वागणुकी द्वारे केली जाते. या योगाच्या प्रभावात व्यक्ती खूप रागीष्ट बनतो.
अशी व्यक्ती कुठला ही निर्णय घेण्यात असक्षम असते परंतु ती न्यायप्रिय असते. स्वभावाणी ही लोकं सहयोगी असतात. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्ती सरकारी पदावर नियुक्त अथवा प्रशासनिक अभिकर्ता बनतो.
अंगारक योग नावानेच आपल्याला कळते ही हा योग अग्निचा कारक आहे. कुंडलीत हा योग बनल्या नंतर व्यक्ती क्रोध आणि निर्णय क्षमतेवरचा ताबा हरवून बसतो. अंगारक योगामुळे मुख्यता क्रोध,अग्निभय, दुर्घटना, रक्ता संबंधित आजार आणि त्वचे संबंधित समस्या होतात.
अंगारक योग शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे फळ देणारा असतो. कुंडलीत हा योग निर्माण झाल्यानंतर व्यक्ती आपल्या परिश्रमाने नाव आणि पैसा कमवतो. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)