Zodiac | एप्रिल महिन्यात बदलणार या 4 राशींचे नशीब, शनी दोषांतून मिळणार मुक्तता

| Updated on: Apr 04, 2022 | 10:59 AM

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एप्रिल महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात सर्व ग्रहांच्या हालचाली बदलतील. यामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडतील.

Zodiac | एप्रिल महिन्यात बदलणार या 4 राशींचे नशीब, शनी दोषांतून मिळणार मुक्तता
zodiac
Follow us on

मुंबई : आकाशात घडणाऱ्या गोष्टींचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ग्रहांनी (Planet) त्यांची दिशा बदलली तरी त्याचे वाईट किंवा चांगले परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतात. ज्योतिषशास्त्राच्या (Jyotish) दृष्टीने एप्रिल महिना बराच खास असणार आहे. या महिन्यात सूर्यमालेतील सर्व ग्रह राशी बदलणार आहेत. त्यात शनी, मंगळ, राहू-केतू यासह इतर सर्व ग्रहांचा समावेश होतो. या महिन्यात शनीचे (Shani) संक्रमण विशेष मानले गेले आहे. याशिवाय राहू-केतू हे ग्रह ही 18 महिन्यांनंतर राशी बदलणार आहेत. ज्याचा जीवनावरही विशेष प्रभाव पडेल. ज्योतिष शास्त्राच्या तज्ञांच्या मते, ग्रहांच्या अशा स्थितीमुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. पण हा महिना 4 राशींसाठी खूप खास असणार आहे. या काळात त्यांच्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी होणार आहेत. शनीच्या दोषांपासून मुक्ताता मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आनंदाचा ठरेल. या लोकांसाठी एप्रिल 2022 खूप खास असणार आहे. ग्रहांचे संक्रमण या राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ग्रहांच्या राशी बदलाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. यासोबतच काही मोठ्या नफ्याच्या संधीही उपलब्ध होतील. याशिवाय या महिन्यात तुम्हाला शनिदेवाच्या धैय्यापासून मुक्ती मिळेल. एवढेच नाही तर या महिन्यात अनेक आर्थिक लाभही होतील. नोकरी-व्यवसायात काळ अनुकूल राहील. या काळात जर तुम्हा नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नक्कीच शुभ वार्ता मिळेल.

कन्या

कन्याकराशींच्या लोकांसाठी हा काळ खूपच आनंदाचा जाईल. आयुष्यातील सुख काही न करताच तुमच्या पदरात पडतील. कन्या राशीच्या लोकांवर ग्रहांच्या राशीतील बदलांचा विशेष प्रभाव पडेल. नोकरदारांना एप्रिलमध्ये विशेष लाभ मिळतील. दुसरीकडे, सरकारी नोकरी करणाऱ्यांना उत्कृष्ट फायदे मिळू शकतात. याशिवाय कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कौटुंबिक जीवनातही आनंद राहील. अचानक धनलाभ होईल किंवा बरेच दिवस रखडलेले पैसे परत मिळतील.

मकर

मकर राशीसाठी हा महिना काहीसा आव्हानात्मक राहिल. या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही नवीन गोष्टींच्या शोधत असाल याच काळात ती गोष्ट तुम्हाला मिळेल. मकर राशीसाठी एप्रिल महिना शुभ राहील. या महिन्यात सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. शनिदेव तुमची राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करतील, त्याचा लाभ होईल. या महिन्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील.

मीन

मीन राशीसाठी एप्रिल महिना शुभ आहे. गुरुच्या राशी बदलामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.ज्यांना व्यवसायात बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील. याशिवाय नोकरी करणाऱ्यांनाही नवीन संधी मिळू शकतात. कोणतीही कामात तुम्हाला यश मिळेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या :

Zodiac | या तीन राशींसाठी हा आठवडा अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर, तुमची रास तर यामध्ये नाही ना?

Zodiac | या राशींचे भाग्य आज उजळणार, हे होतील मोठे फायदेच फायदे!

Weekly Horoscope 10 April to 16 April 2022 | नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोणाला होणार धनलाभ, जाणून घ्या 10 ते 16 एप्रिलपर्यंतचं तुळ ते मीन राशींचे संपूर्ण राशीभविष्य