मुंबई : राशींना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीशी संबंधित असतो. प्रत्येक राशीच्या लोकांची वेगवेगळी वैशिष्ये असतात. काही राशींमध्ये आत्मविश्वास जास्त असतो, काही प्रामाणिक असतात, काही लोकं हट्टी असतात, काही खूप संयमी असतात. एकूणच, वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असल्यामुळे, प्रत्येकाचा स्वभाव देखील भिन्न आहे. आज आपण कुंभ राशीबद्दल (Aquarius Zodiac) जाणून घेऊया. ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र जेव्हा धनिष्ठा नक्षत्राच्या अर्ध्या भागातून, संपूर्ण शतभिषा नक्षत्रातून आणि पूर्वाभद्राच्या 2/3 भागातून जातो तेव्हा या नक्षत्रांत जन्मलेले लोकं कुंभ राशीचे असतात. कुंभ ही सर्व 12 राशींपैकी 9 वी राशी आहे. कुंभ राशीमध्ये जन्मलेले लोकं दृढ, आत्मविश्वासू आणि बुद्धिमान असतात. त्यांची इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रातील कुंभ हे बुद्धिमत्ता, उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. या राशीत जन्मलेले लोक बंडखोर आणि विलक्षण प्रतिभेचे असतात. हे लोकं समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते. हे लोकं खूप भावनिक असतात.
इतर सर्व 12 राशींच्या तुलनेत कुंभ राशीचे लोकं सर्वात दयाळू असतात. हे लोकं नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. माणूसकी काय अते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असते. गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो.
वर वरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात. कोणत्याही करिअर मध्ये ही राशी समय सूचक असते. त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात.
केमिकल , डॉक्टर, इम्पोर्ट एक्स्पोर्ट, वस्त्रे, लोकर , रेशीम, सिल्क च्या वस्तू, विजेची उपकरणे, वायुतत्वावर चालणाऱ्या गोष्टी, जहाज होड्या, मोटार , वकिली शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे, धातूंशी संबंधित व्यवसाय करणे, शिक्षकी पेशा, व्याख्याते घाऊक व्यापारी, रेल्वे एस टी महामंडळात मोठ्या पदावर काम करणे, ह्यांसारख्या करिअर च्या वाटा कुंभ राशीला त्यांच्या मंगळ आणि बुधावरून ठरतात.
पत्रिकेत बुध जास्त सक्रीय असेल तर कुंभ राशीला आपल्या कौशल्याने व्यापार करता येतो आणि गुरुचे बळ कुंभ राशीला पैसा देतो मंगळ मोठ्या पदावर काम करण्यास प्रवृत्त करतो. वरील प्रमाणे शिक्षणाच्या वाटा निवडल्यास कुंभ राशीला करिअर मध्ये त्रास होत नाही.
कुंभ राशींच्या वैवाहिक जीवनात तसे पैसा , प्रॉपर्टीज , वैवाहिक जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा यासाठी कधीच जास्त धावावे लागत नाही. फक्त धावपळ होईल तर रिलेशन जपण्यासाठी. कारण ते प्रपंचात जास्त लक्ष देत नाहीत. यांना वैवीहिक जीवनात मानसिक त्रास होतो. कुंभ राशीचे लोकं वैवाहिक जीवनाबद्दल अरसीक असतात.
मिथुन आणि तुळ राशीच्या व्यक्ती जोखीम पत्करायला तयार असल्याने त्यांचे कुंभेच्या व्यक्तींशी पटू शकते. पण खरं सांगायचं तर सिंहेच्या व्यक्तीचे आणि कुंभ राशीच्या व्यक्तीची जोडी उत्तम संसार करू शकते.
ही वायू राशी असल्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना काही वायू विकार होण्याची शक्यता असते. वाताचा त्रास, नसा गोठून रक्तप्रवाह खंडित होणे, काहींना पोटऱ्या दुखणे असे त्रास होण्याची शक्यता असते. वयाच्या तीशीनंतर कुंभ राशीच्या व्यक्तींना वरील आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीशी ओलांडल्यावर आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)