मनाचा कारक असलेला चंद्र ग्रह 13 वेळा करणार राशी परिवर्तन, कृष्ण पक्षात या राशींना होणार मानसिक त्रास
Image Credit source: Pixabay.Com
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनावर राज्य करणारा ग्रह आहे.चंद्राचं गोचर आणि कला यावर मनाची स्थिती अवलंबून असते. शुक्ल प्रतिपेदपासून पौर्णिमेपर्यंत मानसिक स्थिती प्रबळ होत जाते. तर कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत मानसिक स्थितीत चलबिचल दिसू येते. चंद्राचं एका राशीतून दुसऱ्या राशीतील गोचर हे जवळपास काही तासांसाठी असतं. मात्र या काळात काही जातकांना अचानक भीतीसारखं वाटतं. नेमकं असं का होतं? याबाबत कल्पना देखील येत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एका राशीत जवळपास सव्वा दोन दिवस राहतो. त्यामुळे चंद्र ग्रहाचा अल्पकालीन असतो असं म्हंटलं तरी हरकत नाही. चंद्र ग्रह पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या आणि दहाव्या स्थानात गोचर करत असेल तर चांगलं फळ मिळतं. तर इतर स्थानात त्याची फळं त्रासदायक ठरू शकतात. चंद्राच्या गोचरामुळे कुंडलीत अल्प काळासाठी काही योगही तयार होतात. त्यामुळे कित्येक दिवसांपासून अडकलेली कामंही तात्काळ मार्ग लागतात.
चंद्र गोचर मार्च 2023
- 3 मार्च, शुक्रवार, चंद्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत सकाळी 8:58 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 5 मार्च, रविवार, चंद्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत रात्री 9:30 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 8 मार्च, बुधवार, चंद्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत सकाळी 8:53 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 10 मार्च, शुक्रवार, चंद्र ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत संध्याकाली 6:37 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 13 मार्च, सोमवार, चंद्र ग्रह तूळ राशीतून वृश्चिक राशीत पहाटे 02:18 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 15 मार्च, बुधवार, चंद्र ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत सकाळी 07:33 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 17 मार्च, शुक्रवार, चंद्र ग्रह धनु राशीतून मकर राशीत सकाळी 10:18 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 19 मार्च, रविवार, चंद्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत सकाळी 11:17 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 21 मार्च, मंगळवार, चंद्र ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत सकाळी 11:57 मिनिटांनी प्रवेश करेल.
- 23 मार्च, गुरुवार, चंद्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत दुपारी 14:08 मिनिटांनी प्रवेश करेल
- 25 मार्च, शनिवार, चंद्र ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत संध्याकाळी 19:25 मिनिटांनी प्रवेश करेल
- 28 मार्च, मंगळवार, चंद्र ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत सकाळी 04:25 मिनिटांनी प्रवेश करेल
- 30 मार्च, गुरुवार, चंद्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत दुपारी 16:15 मिनिटांनी प्रवेश करेल
चंद्राचं स्थान त्याची फळं
- चंद्रानं पहिल्या स्थानात गोचर केल्यास जातकाला चांगली बातमी मिळते. सव्वा दोन दिवसात चांगली फळं मिळतात. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरतो. मेहनतीला अपेक्षित फळ मिळतं.
- चंद्राचं दुसऱ्या स्थानातील गोचर अडचणीचं ठरतं. तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळत नाही. या काळात शत्रुपीडा सहन करावी लागते. त्यामुळे व्यवहार करताना काळजीपूर्व करणं गरजेचं आहे.
- चंद्राचं तिसऱ्या स्थानातील गोचर यश मिळवून देण्यास अनुकूल असतो.तुमचा मानसन्मान या काळात वाढू शकतो. तसेच आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येते.
- चंद्राचं चौथ्या स्थानातील गोचर जीवन धीम्या गतीने आणि अस्थिर होतं. तसेच खर्चातही वाढ होते.त्यामुळे आर्थिक गणित या काळात बिघडतं. त्यामुळे या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
- चंद्राचं पाचव्या स्थानातील गोचरामुळे चांगले परिणाम दिसून येतात. लोकांना तुमच्याकडून या काळात अपेक्षा वाढतात. मात्र दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करताना चुकीचं पाऊल उचलत तर नाही ना याची काळजी घ्या. अन्यथा फटका बसू शकतो.
- चंद्राचं सहाव्या स्थानातील गोचरामुळे तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची उर्जा जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या उर्जेचा पुरेपूर वापर कराला. तुमच्या जोडीदार आणि कुटुंबासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.तुमचा मित्रपरिवार या काळात वाढेल.
- चंद्राचं सातव्या स्थानातील गोचर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळताना दिसेल.विदेशी कंपन्यांसोबत तुमचा करार या काळात निश्चित होऊ शकतो. तसेच आपल्या प्रतिस्पर्ध्याला मात देण्यास अनुकूल काळ आहे.
- चंद्राचं आठव्या स्थानातील गोचरामुळे कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. बॉसकडून विनाकारण त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि सहजासहजी सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. कारण त्यांच्या षडयंत्रात तुमचं नुकसान होऊ शकतं.
- चंद्राने नवव्या स्थानात गोचर केल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. तसेच वरिष्ठांच्या दबावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात काळजीपूर्वक पावलं उचला. शत्रूपीडा होण्याची दाट शक्यता असते. कौटुंबिक जीवन साधारण राहील.
- चंद्राचं दहाव्या स्थानात गोचर होताच चांगलं फळ मिळेल. व्यवसायातही या काळात फायदा होईल. तुमचे सहकारी तुमच्या कामावर खूश राहतील. त्यामुळे काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंददायी राहिल. या काळात नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.
- चंद्राचं अकराव्या स्थानातील गोचर जीवनात अनेक बदल घडवून आणेल. पण हे बदल सकारात्मक आणि चांगले असतील. प्रेमी युगुलांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. मात्र हे पद आव्हानात्मक असेल याचं भान ठेवाल.
- चंद्राचं बाराव्या स्थानातील गोचर जातकाचे बारा वाजवतं. जर तुम्ही कोणतंही चुकीचं काम करत असाल तर त्याचं फळ भोगावं लागेल. अवैध कामात असाल तर लगेच सोडून द्या. चंद्र गोचरामुळे मोठा फटका बसू शकतो. तसेच या काळात कोणालीही पैसे उधार म्हणून देऊ नका, परत कधीच मिळत नाहीत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)