Astro Tips: लग्न जुळण्यात येत असतील बाधा तर, ज्योतिष शास्त्रात सांगीतले आहेत उपाय

| Updated on: Jan 21, 2023 | 8:26 PM

ज्योतिष शास्त्रामध्ये लग्नातील दोष दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन करून कुंडलीतून विवाहाशी संबंधित दोष दूर केला जाऊ शकतो.

Astro Tips: लग्न जुळण्यात येत असतील बाधा तर, ज्योतिष शास्त्रात सांगीतले आहेत उपाय
जोतीष्यशास्त्रातले उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न ही म्हण अनेकांनी प्रत्येक्षात अनुभवली असेल. बऱ्याचदा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी पात्र असतात मात्र परंतु या ना त्या कारणाने लग्न निश्चित करण्यात सतत विलंब होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार (Astro Tips For Marriage) लग्नाला उशीर होण्याचे कारण कुंडली दोष असू शकतात. वधू-वरांच्या कुंडलीत काही दोष असतात ज्यामुळे लग्नाला उशीर होतो. यामुळे लग्न काही ना काही कारणाने पूर्ण होऊ शकत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नातील दोष दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन करून कुंडलीतून विवाहाशी संबंधित दोष दूर केला जाऊ शकतो.

कुंडली दोषामुळे होतो लग्नाला विलंब

कुंडलीचे सातवे घर पती-पत्नीशी संबंधित आहे. कुंडलीच्या सातव्या घरात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह असतात तेव्हा लग्नाला विलंब होतो. जेव्हा मंगळ चतुर्थ भावात किंवा चढत्या भावात असतो आणि शनि सातव्या भावात असतो तेव्हा त्या व्यक्तीला लग्न करण्याची इच्छा नसते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या सातव्या घरात शनि आणि गुरु असतात तेव्हा लग्नाला विलंब होतो. याशिवाय जर चंद्र राशीतून सातव्या घरात गुरु असेल तर लग्नात विलंब होतो. कर्क राशीतून सप्तम भावात गुरु ग्रह असला तरी लग्नात अनेक प्रकारचे अडथळे येतात.

हे सुद्धा वाचा

मुलीच्या कुंडलीतील सप्तम स्वामी शनि त्रस्त असतो तेव्हा लग्नात विलंब आणि विविध अडथळे येतात. राहूची दशा चालू असून सप्तम भावात राहु दोष निर्माण करत असेल तर लग्नानंतर त्याचे खंडन होण्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू किंवा शुक्र चढत्या भावात, सातव्या भावात आणि बाराव्या भावात शुभ नसतो आणि चंद्रही कमजोर असतो तेव्हा लग्नात अडथळे येतात.

लवकर लग्नासाठी ज्योतिषीय उपाय

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार गुरू, शनि आणि मंगळ हे लग्न उशीरा होण्याचे कारण आहेत, अशा स्थितीत या ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी त्यांच्याशी संबंधित उपाय करावेत. लवकर विवाहासाठी आणि विवाहातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी भगवान शंकरासोबत पार्वतीची पूजा करावी. माँ पार्वतीच्या पूजेच्या वेळी विवाहयोग्य मुलींना सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात.

विवाहाशी संबंधित मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुवारी व्रत ठेवा आणि भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा.
लवकर विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज सकाळी गणपतीसोबत रिद्धी-सिद्धीची पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)