मुंबई : मान्यतेनुसार, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे. त्यामुळे रुद्राक्ष (Rudhraksha) धारण केल्याने शिवाची कृपा शिव भक्तावर कायम राहते. ते धारण केल्याने साधकाचे संकटांपासून संरक्षण होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. एवढेच नाही तर रुद्राक्षला विज्ञानातही खूप प्रभावी मानले गेले आहे. हिंदू धर्मात रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे ज्योतिषशास्त्रात (Astro Tips) सांगण्यात आले आहेत. 1 ते 14 मुखी रुद्राक्षाचे स्वतःचे महत्त्व आहे. यासोबतच व्यक्तीने आपल्या राशीनुसार कोणता रुद्राक्ष धारण करावा हे देखील सांगण्यात आले आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी तीनमुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते.
वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे. सहामुखी रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्याला लाभ मिळतो, तर प्रगतीचा मार्गही खुला होतो.
मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावे. असे केल्याने या राशीच्या लोकांसाठी प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता वाढते.
कर्क राशीचे लोक दोन मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. चंद्र कर्क राशीचा ग्रह असल्यामुळे त्यांच्यासाठी दोन मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते.
सिंह राशीसाठी बारा मुखी रुद्राक्ष योग्य मानले जाते. त्यांच्या विकासासाठी हे शुभ मानले जाते.
दुसरीकडे, धनु आणि मीन राशीचे लोक 5 मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. हे धारण केल्याने समाजात मान-सन्मान मिळतो. यासोबतच नशीबही तुमची साथ देते.
मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना 7 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने लाभ होऊ शकतो. सात मुखी रुद्राक्ष धारण केल्याने सर्व वाईट गोष्टी घडू लागतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)