मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहाकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार तो ग्रह तशी फळं देतो. मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम याचा कारक मानला जातो. असा हा मंगळ ग्रह सध्या मिथुन राशीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 10 मे 2023 रोजी दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत मंगळ ग्रह 1 जुलै 2023 पर्यंत रात्री 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत राहील. कर्क ही मंगळाची नीच रास आहे.
मंगळाला चौथी, सातवी आणि आठवी दृष्टी आहे. मंगळाचे रवि, चंद्र, गुरु हे मित्र ग्रह आहेत. तर बुध हा शत्रू ग्रह आहे. दुसरीकडे शुक्र आणि शनि सम ग्रह आहेत. त्यामुळे हे गोचर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.
मेष : या राशीच्या चौथ्या स्थानात मंगळ ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. आर्थिक स्थिती चांगली असल्याने कामं पटापट होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामांचं कौतुक होईल. तसेच वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पडेल. त्यामुळे पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा जमिन खरेदीचा योग आहे.
कन्या : या राशीच्या एकादश भावात मंगळ गोचर करणार आहे. त्यामुले या राशीच्या जातकांना मंगळाचं पाठबळ मिळेल. आर्थिक स्थिती रुळावर येईल. सर्व काही योग्य पद्धतीने होत असल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरी आणि व्यवसायातही अनुकूल परिणाम दिसून येतील. मित्रांकडून अडचणीच्या काळात सहकार्य होईल.
कुंभ : या राशीच्या षष्ठम भावात मंगळ गोचर करणार आहे. त्यामुळे साहसी आणि पराक्रमी गुणधर्म असलेला मंगळ शत्रूपक्षाला सळो की पळो करून सोडले. कामाच्या ठिकाणी तुमचा दरारा राहील. मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवाल. आर्थिक स्थिती व्यवस्थित राहील. तसेच तुमच्याकडून इतरांना मदत होईल. मित्र किंवा नातेवाईकांसोबत फिरायला जाण्याचा योग जुळून येईल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )