मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह जातकांना भौतिक सुखांची अनुभूती करून देतो. शुक्र हा ग्रह प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे. सध्या शुक्र हा ग्रह कर्क राशीत असून 7 जुलै 2023 रोजी पहाटे 3 वाजून 59 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत मंगळसोबत युती होणार आहे. दुसरीकडे, याच राशीत शुक्र ग्रह 4 ऑगस्ट 2023 रोजी अस्ताला जाणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना सांभाळून राहावं लागणार आहे. कारण अस्ताला गेलेला शुक्र ग्रह वैवाहिक आणि आर्थिक स्थितीत अडचणींचा डोंगर उभा करतो. त्यामुळे शुक्राच्या स्थिती तीन राशींच्या जातकांना डोकेदुखी ठरणार आहे.
कर्क : शुक्र ग्रह या राशीच्या चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी आहे. अस्ताला जाणार असल्याने कर्क राशीच्या जातकांना सांभाळून राहावं लागेल. धन आणि वाणीच्या स्थानात शुक्र अस्ताला जाणार आहे. त्यामुळे शक्ती क्षीण झाल्याने फटका बसेल. या काळात धनहानी होण्याची शक्यता आहे. उधारीवर दिलेले पैसे बुडण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण नसल्याने मतभेत होतील. तसेच टोकाचे वाद होण्याची शक्यता आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना काळजी घ्या.
सिंह : शुक्र या राशीच्या लग्न स्थानात अस्ताला जाणार आहे. तसेच या राशीच्या तिसऱ्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे अस्ताला गेलेल्या कालवधीत तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात भावकीचा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळे. दुसरीकडे, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने कामाचा व्याप वाढेल.
मीन : शुक्र ग्रह या राशीच्या सहाव्या स्थानात अस्ताला जाणार आहे. हे स्थान रोग, शत्रू आणि दुर्घटनेशी संबंधित मानलं जातं. त्यामुळे गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच लांबचा प्रवास या काळात टाळात. तसेच वाहन जरा जपून चालवा. अपघात होण्याची शक्यता या काळात आहे. आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कोणाला पैसे देताना शंभर वेळा विचार करा. शनीची साडेसाती आणि शुक्र अस्ताला गेल्याने मानसिक आरोग्य या काळात ढासळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)