मुंबई : राशीचक्रात ग्रहांचं गणित वेळोवेळी बदलत असतं. ग्रह एखाद्या राशीत काही कालावधीसाठी असतो आणि त्यानंतर पुढच्या राशीत एन्ट्री मारतो. पण एखादी स्थिती पुन्हा कधी परत तशीच येईल सांगता येत नाही. अनेकदा काही योग शेकडो वर्षानंतर जुळून येतात. असाच एक दुर्लभ योग 500 वर्षानंतर जुळून येणार आहे. 23 एप्रिलला दुर्लभ असा केदार योग तयार होणार आहे. हा योग जन्मकुंडलीच्या 4 स्थानात जेव्हा 7 ग्रह स्थित असतात तेव्हा तयार होतो. या योगामुळे अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती झपाट्याने होताने दिसते.
मेष राशीत सूर्य, गुरु, राहु आणि बुध ग्रहे एकत्र येणार आहे. तर इतर तीन राशीत तीन ग्रह असणार आहे. त्यामुळे चार राशीत सात ग्रह ठाण मांडून असणार आहेत. त्यामुळे केदार योग तयार होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या चार राशींना फायदा होईल.
मेष – या राशीत चार ग्रह एकत्र येणार आहेत. दुसऱ्या स्थानात शुक्र असणार आहे आणि तिसऱ्या स्थानात मंगळ आणि चंद्र असेल. तर शनिदेव अकराव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मान सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या ठिकाणी फायदा होईल. इंक्रिमेंट आणि प्रमोशनचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील आणि जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
सिंह – या राशीच्या जातकांना केदार योगाचा फायदा होईल. या राशीच्या गोचर कुंडलीतील सप्तम, नवम, दशम आणि अकराव्या स्थानात केदार योग तयार होत आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील. तुमच्या कामावर बॉस खूश असल्याचं दिसून येईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यापाऱ्यांना या काळात चांगल्या ऑर्डर्स मिळतील. मित्र परिवाराकडून चांगली मदत होईल. कौटुंबिक कलह दूर होतील आणि आनंदाचं वातावरण राहील.
कर्क – या राशीला ग्रहमान आणि केदार योगाचा फायदा होईल. न्यायालयीन प्रकरण सुरु असेल तर त्याचा निकाल अपेक्षित येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नतीचा योग आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. तसेच विदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
मकर – या राशीच्या जातकांना केदार योगाचा फायदा होईल. तुम्ही ज्या कामात हात घालात त्या कामात यश मिळेल. अविवाहीत लोकांना या काळात एखादं स्थळ चालून येऊ शकतं. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही एखादा नवा बिझनेस करू शकता. यामुळे तुम्हाला फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ या काळात अपेक्षित आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)