मुंबई : राशीचक्रात शनि हा सर्वात धीम्या गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे. शनि एकदा राशीत आला की अडीच वर्षे ठाण मांडून बसतो. त्यामुळे जातकाना पुरतं भंडांवून सोडतो असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा, तर मकर राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. दुसरीकडे कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. त्यामुळे शनिची स्थिती राशीचक्राच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची ठरते. सध्या शनिदेव कुंभ राशीत असून वक्री अवस्थेत आहेत. 17 जूनपासून वक्री झाले आहेत. आता 4 नोव्हेंबरपासून शनिदेव मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे.
मिथुन : शनिदेवांची स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. कारण या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध आणि शनिमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे 4 नोव्हेंबरनंतर शनिची उत्तम साथ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी हा काळ उत्तम असेल. तसेच देवदर्शनासाठी प्लानिंग आखू शकता. रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना या काळात यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
सिंह : शनिदेव मार्गी होताच या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कारण या राशीच्या सप्तम स्थानात शनिदेव मार्गी होणार आहेत. त्यामुळे पार्टनरशिपच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. शनिदेवने या राशीत शश राजयोग तयार केला आहे. त्यामुळे अपेक्षित यश मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणातही निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे आणखी दिवस संयम ठेवा. हातात पैसा खेळता असेल तेव्हा स्वभाव शांत ठेवणंही गरजेचं आहे.
तूळ : शनिदेव या राशीच्या पंचम स्थानात मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांकडून शुभ बातमी मिळू शकते. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल. गेल्या काही दिवसापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न सुरु असेल, तर ते काम या काळात पूर्ण होईल. नोकरी आणि उद्योग धंद्यातही प्रगती होऊ शकते. पत्नीकडून उत्तम साथ मिळेल आणि तिच्याकडून आर्थिक मदत होऊ शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)