Astrology 2023 : पाच दिवसांनी बुध ग्रह जाणार अशा स्थितीत, राशीचक्रातील या राशींवर असेल कृपा

| Updated on: Jul 20, 2023 | 8:28 PM

बुध ग्रहाला नवग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. बुधाची स्थिती बरंच काही घडवून जाते. तसेच सूर्याच्या जवळ असणारा ग्रह असल्याने ठरावीक कालावधीने उलथापालथ होत असते.

Astrology 2023 : पाच दिवसांनी बुध ग्रह जाणार अशा स्थितीत, राशीचक्रातील या राशींवर असेल कृपा
बुध ग्रहाच्या अशा स्थितीमुळे राशीचक्रावर होणार परिणाम, कोणत्या राशी ठरतील लकी जाणून घ्या
Follow us on

मुंबई : ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशी बदलाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पाच दिवसानंतर बुध ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 25 जुलै 2023 रोजी पहाटे 4 वाजून 38 मिनिटांनी सिंह राशीत जाणार आहे. विशेष म्हणजे ही सिंह ही सूर्याची स्वामित्व असलेली रास आहे.ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि बुधाचं नातं एकदम चांगलं मानलं जातं. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे शुभ असा बुधादित्य योगही जुळून येतो. कर्क राशीत बुधादित्य योग सुरुच आहे. 25 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत हा योग संपुष्टात येईल. सूर्य पुढच्या महिन्यात म्हणजेच 17 ऑगस्ट 2023 रोजी पुन्हा सिंह राशीत एन्ट्री मारणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा शुभ असा बुधादित्य योग जुळून येईल.

बुध सिंह राशीत 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. बुधाच्या गोचरामुळे राशीचक्रावर शुभ अशुभ परिणाम दिसून येतील. तीन राशीच्या जातकांना बुद्धिकारक ग्रह पाठबळ देईल. कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल, जाणून घ्या

तीन राशींवर होईल परिणाम

मिथुन : या राशीच्या तिसऱ्या स्थानात बुध गोचर करणार आहे. त्यामुळे एखादं लक्ष्य गाठणं सोपं होईल. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. जागा किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तेही पूर्ण होईल असं ग्रहमान आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायी ठरेल.

सिंह : याच राशीत पाच दिवसांनी बुध ग्रह विराजमान होणार आहे. त्यामुळे बुधाचं पाठबळ मिळेल. लग्नस्थान असल्याने स्वभावात लक्षणीय बदल दिसून येईल. तसेच आत्मविश्वासाने किचकट कामं पूर्ण कराल. आर्थिक स्थिती भक्कम होईल, पण त्यासोबत इतर खर्चही वाढतील. एकंदरीत गोचर कालावधीत लाभ होईल.

तूळ : या राशीच्या एकादश भावात बुधाचं गोचर होणार आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळे. या काळात सुरु केलेला नवा धंदा फळेल असंच ग्रहमान आहे. आरोग्यविषयक तक्रारीही दूर होतील. एकंदरीत केलेल्या परीश्रमाचं चांगलं फळ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)