मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य हा एका महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे राशीभ्रमण करत एका राशीत परतण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. सध्या सूर्यदेव स्वत:च्या सिंह राशीत ठाण मांडून बसला आहे. या राशीत महिना पूर्ण होताच सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. वर्षभरानंतर सूर्य कन्या राशीत येत आहे.सूर्याच्या राशी गोचराला पंचांगानुसार संक्रांती संबोधलं जातं. कन्या राशीत प्रवेश करणार असल्याने कन्या संक्रांती म्हंटलं जातं. सूर्य 17 सप्टेंबर 2023 रोजी, सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम दिसून येईल. विशेष करून चार राशीच्या जातकांना लाभ होणार आहे.
सिंह : या राशीच्या दुसऱ्या स्थानात सूर्य गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. तसेच करिअरमध्ये नवीन शिखरं गाठाला. कौटुंबिक स्तरावर तुम्हाला चांगली साथ मिळेल. या कालावधीत फक्त रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट आपल्या विरोधात होत असेल तर डोकं शांत ठेवा.
कन्या : या राशीच्या लग्नभावात सूर्य गोचर करणार असल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. तुमचा प्रभाव ठळकपणे दिसून येईल.समाजात मानसन्मान वाढेल. तसेच तुमच्या शब्दांचं वजन वाढेल. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील.
वृश्चिक : या राशीच्या अकराव्या स्थानात सूर्य गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांची पदोन्नती होऊ शकते. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांनाही सकारात्मक परिणाम दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदरवारांना यश मिळेल.
धनु : या राशीच्या दहाव्या स्थानात सूर्य गोचर करणार आहे. यामुळे या राशीच्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. करिअरमध्ये काही नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने किचकट कामं पूर्ण कराल. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)