मुंबई : ग्रहमंडळात ग्रह गोचर करत असताना आपली घातक दृष्टी एकमेकांवर टाकत असतात. कधी कधी याचे गंभीर परिणाम जातकांना भोगावे लागतात. सध्या सूर्य, शनि आणि राहु यांची घातक दृष्टी तयार झाली आहे. म्हणजेच हे तिन्ही ग्रह एकमेकांकडे घातक दृष्टीने पाहात आहे. त्याचबरोबर मेष राशीत राहु आणि गुरुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार झाला आहे. दुसरीकडे शनि आणि सूर्याच्या स्थितीमुळे समसप्तक योग तयार होत आहे. यामुळे याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. त्यामुळे राशीचक्रातील काही जातकांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. खासकरून राशीचक्रातील चार राशींना सांभाळून राहणं गरजेचं आहे. कोणतीही जोखिम उचलताना विचार करणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात चार राशींबाबत..
वृषभ : या राशीच्या जातकांनी 30 ऑक्टोबरपर्यंत कोणतंही नवं काम हाती घेऊ नये. कारण गोचर कुंडलीत 12 व्या स्थानात गुरु आणि राहुची युती झाली आहे. त्यात शनि, राहु आणि सूर्य एकमेकांकडे घातक दृष्टीने पाहात आहेत. त्यामुळे खर्चात वाढ होईल. तसेच काही कामं फिस्कटून जातील. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. करिअरमध्येही मोठी चढउतार पाहायला मिळतील. मोठी जोखिम असलेली गुंतवणूक करू नका.
कर्क : या राशीच्या जातकांना शनिची अडचकी सुरु आहे. त्यात शनिदेव दहाव्या स्थानावर पाहात असून याच स्थानात गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. त्यामुळे आयुष्यात नकोशा घटना घडतील. नोकरी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नामस्मरण आणि डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हाती असलेला पैसा विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्या. एखादा आजार बळावू शकतो. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कन्या : या राशीच्या अष्टम स्थानात गुरु चांडाळ योग तयार होत आहे. दुसरीकडे शनि राहुकडे पाहात आहे. त्यामुळे या कालावधीत तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. उद्योगधंद्यात काही अकस्मित घटना घडतील. मोठा आर्थिक फटका बसू शकतो. व्यवसायात गुंतवणूक शक्यतो करू नका. खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक : या राशीच्या जातकांना शनिची अडीचकी सुरु आहे. शनिदेव चतुर्थ स्थानात असून गुरु आणि राहुकडे पाहात आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी तणावाची स्थिती दिसून येईल. या कालावधीत कोणालाही उधारी देऊ नका. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी काही काळ थांबणं गरजेचं आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)