मुंबई : ग्रहांच्या गोचर कालावधी आणि त्यांचा स्वभाव यावर बरंच काही अवलंबून असतो. राहु आणि केतु हे ग्रह सोडले तर प्रत्येक ग्रहांकडे राशींचं स्वामित्व आहे. त्यामुळे ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येते. सूर्य हा ग्रह महिनाभरानंतर राशी बदल करतो. तर मंगळचा गोचर कालवाधी, अस्त-उदय आणि वक्री होण्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. सूर्यदेव 17 सप्टेंबरला सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत मंगळ ग्रह ठाण मांडून बसला आहे. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे दुहेरी षडाष्टक योग तयार होत आहे. हा योग अंत्यत अशुभ गणला जातो. यामुळे तीन राशीच्या जातकांना सांभाळून राहणं गरजेचं आहे.
मेष : या राशीच्या जातकांना षडाष्टक योग त्रासदायक ठरणार आहे. कारण मंगळ आणि सूर्याची युती या राशीच्या सहाव्या स्थानात होत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच शत्रूपक्षाकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. न्यायालयीन प्रकरणातही त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. गुंतवणुकीत आर्थिक फटका बसू शकतो. या कालावधीत कोणालाही पैसे उधार देऊ नका.
वृषभ : या राशीच्या पंचम स्थानात मंगळ आणि सूर्याची युती होत आहे. त्यामुळे मुलांची काळजी घ्या. शक्यतो गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेम प्रकरणात अडचण येऊ शकते. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. या कालावधीत सूर्य आणि मंगळ ग्रहाची उपासना करा. तसेच मंगळवारी उपवास ठेवा.
मिथुन : सूर्य आणि मंगळाची युती या राशीच्या चतुर्थ स्थानात होत आहे. त्यामुळे आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आईच्या आजारपणामुळे टेन्शन वाढेल. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. कोणत्याही व्यवहार करताना काळजी घ्या. उसनवारी तर अजिबात करू नका. दिलेले पैसे परत मिळणं कठीण आहे. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. त्यामुळे वाद होईल असं वागू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)