Astrology 2023 : चंद्र तूळ राशीत येताच सुरु होणार ग्रहण योग, 5 मे रोजी चंद्रग्रहणाचा काय परिणाम होणार? जाणून घ्या

| Updated on: May 01, 2023 | 12:16 PM

चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याचं महत्त्व आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण तूळ राशीत असणार आहे. या राशीत चंद्र आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे.

Astrology 2023 : चंद्र तूळ राशीत येताच सुरु होणार ग्रहण योग, 5 मे रोजी चंद्रग्रहणाचा काय परिणाम होणार? जाणून घ्या
Astrology 2023 : तूळ राशीत चंद्र आणि केतूच्या युतीमुळे ग्रहण, 5 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहण आणि राशींवरील परिणाम समजून घ्या
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे काही योग जुळून येतो. चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. त्यामुळे शुभ अशुभ योग जुळून येतो. चंद्र 4 मे रोजी कन्या राशीतून तूळ राशीत सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी प्रवेश करेल. त्यानंतर 5 मे रोजी रात्री 8 वाजून 44 मिनिटांपासून मध्यरात्री 1 वाजून 2 मिनिटांपर्यंत राहील. खगोलशास्त्रानुसार, चंद्रग्रहण सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हा होतं. म्हणजेच पृथ्यी या दोघांच्या मते येते त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते.

5 मे 2023 रोजी चंद्रगहण 139 वर्षांनी बुद्ध पौर्णिमेला होणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं.पण 5 मे रोजी 2023 रोजी असलेलं चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ मान्य नाही. छायाकल्प चंद्रग्रहण यूरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिक, हिंदी महासागर आणि अंटार्कटिकातून दिसेल.

चंद्र ग्रहणाचा चार राशींवर परिणाम दिसून येईल

मेष : चंद्रग्रहणाच्या कालावधील काळजी घेणं आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेताना आतातायीपणे घेऊ नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. मानसिक ताण या काळात तुम्हाला जाणवेल. त्यामुळे दिवसभर चलबिचल झालेली असेल. या काळात चंद्र मंत्र जप करावा. जेणेकरून मानसिक स्थिती ठीक राहील.

वृषभ : या राशीच्या जातकांनी संयम पाळणं गरजेचं आहे. वाद विवाद या काळात करू नये. कारण तुमच्या बोलण्याने वाद चिघळू शकतो. त्यामुळे शांतपणे परिस्थिती हाताळा. विनाकारण वाद होईल असं वागू नका. प्राणायाम आणि ध्यान करून मन शांत करा.

कर्क : चंद्रग्रहणाच्या कालावधीत आरोग्याकडे लक्ष द्या. कारण काही आजार डोकं वर काढू शकतात. काही प्रकरणांचा तुम्हाला मानसिक त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करून शांत राहण्याचा आटोक्यात प्रयत्न करा. देवी दुर्गेचे जाप करा तुम्हाला मानसिक स्थिरता मिळेल.

सिंह : कौटुंबिक वातावरण थोडं तणावपू्र्ण असेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात वाद होताना दिसतील. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं राहील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुलदैवतेचं नामस्मरण करा.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )