मुंबई : ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बलस्थानावरून योगांची स्थिती ठरवली जाते. दोन ग्रहांची राशीचक्रातील स्थिती बरंच काही घडवून जाते. सध्या देवगुरु बृहस्पती मेष राशीत आहे. तर मंगळ ग्रह सिंह राशीत 18 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या दोन ग्रहांच्या स्थितीमुळे नवपंचम योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा सर्वात शुभ योग असल्याचं मानलं जातं. जवळपास 50 वर्षांनी गुरु आणि मंगळाची अशी स्थिती आहे. गुरु ग्रह सध्या युवा अवस्थेत आहे. त्यामुळे असा राजयोग बऱ्याच कालावधीनंतर जुळून आला आहे. या योगामुळे चार राशींच्या जातकांना शुभ फळं उपभोगता येणार आहेत.
मेष : गेल्या काही दिवसांपासून अडचणीत असलेल्या जातकांना या योगामुळे लाभ मिळणार आहे. कारण मंगळ या राशीचा स्वामी आहे. मंगळ ग्रह गोचर कुंडलीत त्रिकोणमध्ये सिंह राशीत आहे. तसेच गुरुची दृष्टी पडत आहे. त्यामुळे या राशीच्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांच्या डोक्यावरील टेन्शन हलकं होईल. नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते. अचानकपणे होणाऱ्या सकारात्मक बदलामुळे मन प्रसन्न राहील.
कर्क: मंगळ आणि गुरुची स्थिती या राशीच्या जातकांनाही फायदेशीर ठरणार आहे. या स्थितीमुळे करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. इच्छित नोकरी जातकांना मिलू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना यश मिळेल. काही अशक्यप्राय गोष्टी घडल्याने आनंद द्विगुणित होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
सिंह: मंगळ ग्रह सध्या याच राशीत विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना मंगळ आणि गुरुची चांगली फळं मिळतील. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. पत्नीकडून गोड बातमी कानावर पडेल. तसेच नातेवाईकांकडून चांगली मदत या काळात होईल. आर्थिक भार या काळात हलका होईल.
धनु : प्रवासाच्या दृष्टीकोनातून नवपंचम योग लाभदायी ठरेल. प्रवासातील कामं झटपट पूर्ण होतील. त्यामुळे प्रवासाचा आनंद लुटता येईल. सकारात्मक बदलासह आर्थिक स्थितीही या काळात बदलेल. परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या जातकांना हा काळ चांगला ठरेल. या काळात एखादी चांगली स्थिती जुळून येईल. तसेच परदेशात शिकण्याचं स्वप्न पूर्ण होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)