मुंबई : राशीचक्रात चंद्र हा सर्वात वेगाने घडामोडी घडवणारा ग्रह आहे. कारण चंद्राचा गोचराचा वेग इतर ग्रहांच्या तुलनेत जास्त आहे. एका राशीत सव्वा दोन दिवस ठाण मांडल्यानंतर चंद्र दुसऱ्या राशीत गोचर करतो. या गोचर कालावधीत नवग्रहातील ग्रहांशी गाठीभेटी होत असतात. यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जातकांवर सर्वाधिक मानसिक प्रभाव दिसून येतो. चंद्र ग्रह 25 जुलैला कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत केतु आधीच ठाण मांडून बसल्याने अशुभ असा ग्रहण योग तयार होणार आहे. तीन राशीच्या जातकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
चंद्र आणि केतु एकाच स्थानात असतील तर कुंडलीत पूर्ण चंद्र ग्रहण दोष लागतो. राहु आमि चंद्राच्या युतीमुळे अर्ध चंद्र ग्रहण योग लागतो. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. अशा स्थितीत केतु थेट मनावर परिणाम करतो. त्यामुळे निर्णय घेताना चिडचिडेपणा दिसून येतो.
मेष : या राशीच्या आठव्या स्थानात केतु असल्याने या स्थानातच ग्रहण योग तयार होणार आहे. त्यामुळे जातकाच्या वैवाहित जीवनात अडचणी निर्माण होतील. व्यवसायात आर्थिक फटका बसू शकतो. कामात लक्ष लागणार नाही. घेतलेल्या निर्णय चुकीचे ठरू शकतात. शारीरिक आणि मानसिक समस्या जाणवतील.
वृषभ : या राशीच्या सातव्या सातव्या स्थानात चंद्र आणि केतुची युती होणार आहे. त्यामुळे पत्नीसोबत काही कारणामुळे वाद निर्माण होईल. लग्न ठरलेल्या जातकांना काही कारणास्तव अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शत्रू पक्षाकडून तुम्हाला नाहक त्रास होईल. वादामुळे न्यायालयाची पायरी चढावी लागू शकते. आरोग्य विषयक तक्रारींकडे कानाडोळा करू नका.
तूळ : चंद्र आणि केतुची या राशीत होणार आहे. त्यामुळे सव्वा दोन दिवस स्वभावात बदल दिसून येईल. मानसिक त्रास होईल. तसेच चलबिचल होईल आणि तडकाफडकी काही निर्णय घ्याल. कुटुंब किंवा मित्रांसोबत संबंध खराब होऊ शकतात. सव्वा दोन दिवसात मोठे निर्णय घेणं टाळा. तसेच वाद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)