मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपला कालावधी पूर्ण झाला की राशी बदल करत असतो. त्यात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा वेगळा आहे. त्यामुळे एका राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येऊ शकतात. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. तर शनि हा सर्वात मंद गतीने प्रवास करणारा ग्रह गणला जातो. त्यामुळे चंद्राची इतर ग्रहांसोबत युती होत असते. या कालावधीत शुक्ल की कृष्ण पक्ष हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. शुक्ल पक्षातील चंद्र फलदायी ठरतो. तर कृष्ण पक्षात चंद्र क्षीण होत असल्याने त्याची फळं हवी तशी मिळत नाहीत. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होत आहे. चला जाणून घेऊयात एकंदरीत स्थिती..
20 जून रोजी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत दुपारी 3 वाजून 58 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत मंगळ असल्याने चंद्रासोबत युती होणार असल्याने लक्ष्मीयोग तयार होईल. मंगळ हा ग्रहांचा सेनापती आणि योद्धा मानला जातो. मंगळ हा रक्ताचा कारक आहे आणि कोणत्याही व्यक्तीचे धैर्य आणि शौर्य दर्शवितो. तसेच शुक्र ग्रहासोबतच्या युतीमुळे कलात्मक योग तयार होईल.
मिथुन : या राशीच्या दुसऱ्या स्थानात लक्ष्मी योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. दुसऱ्या स्थानाला धन आणि कुटुंबाचं स्थान म्हंटलं जातं. यामुळे या राशीच्या जातकांना अडीच दिवसात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील. घरातील व्यक्तींची तुम्हाला प्रत्येक कामात मदत होईल. त्यामुळे काही आर्थिक गणितं या काळात सुटतील. तसेच या काळात बचतही होईल.
सिंह : या राशीच्या एकादश भावात लक्ष्मी योग तयार होणार आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे. या स्थानात लक्ष्मी योगाची स्थिती निर्माम होत असल्याने उत्पन्नात वाढ होईल. तसेच काही गोष्टींतून लाभ होऊ शकतो. लॉटरी किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. अडीच दिवसात कोणाला पैसे उधारी देण्याच्या भानगडीत पडू नका.
कन्या : या राशीच्या दशम स्थानात लक्ष्मीयोग तयार होत आहे. हे स्थान करिअर आणि व्यवसायाशी निगडीत आहे. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. तसेच मनासारखा पगार मिळणार असल्याने आनंदी राहाल. दुसरीकडे, व्यवसायात या काळात चांगला नफा होऊ शकतो. काही करार पूर्णत्वास जातील. तसेच त्यातून चांगला परतावा मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)