मुंबई : एप्रिल महिन्यात देवगुरु बृहस्पतीने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. या राशीत बृहस्पती वर्षभरासाठी राहणार आहे. त्यानंतर आता इतर ग्रहांच्या हालचाली सुरु होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात धनदाता आणि राक्षसांचा गुरु असलेला शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 2 मे 2023 रोजी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी हे गोचर होणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या गोचरामुळे शुभ फळ मिळू शकतात. या राशीत या आधीच मंगळ ग्रह ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे मंगळ आणि शुक्राची युती पाहायला मिळणार आहे.
मंगळ आणि शुक्राची युती मिथुन राशीत 8 दिवस राहील. मंगळ ग्रह 10 मे रोजी दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत 1 जुलै 2023 पर्यंत मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर 30 मे रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल.
मंगळ ग्रहाला आत्मविश्वास आणि साहसाचं प्रतिनिधित्व मानलं गेलं आहे. तर शुक्र ग्रहाला आत्मसन्मान, धनवैभव यांचा कारक मानलं गेलं आहे. चला जाणून घेऊयात या युतीचा कोणत्या राशींना फायदा होईल ते…
मेष : शुक्र आणि मंगळ या राशीच्या तिसऱ्या स्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे जातकांना कौटुंबिक आनंद अनुभवता येईल. मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. भावंडांमध्ये तुम्हाला प्रेम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल.
वृषभ : मंगळ आणि शुक्राची युती या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धनस्थानात होत आहे. यामुळे जातकांना सुख, समृद्धी, धनसंपदा आणि आनंदाची अनुभूती मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. पदोन्नती किंवा पगारवाढ या काळात होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तुम्हाला तणाव दिसून येईल.
कन्या : या राशीच्या दशम भावात मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे जातकांना नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. केलेल्या कामाचं अपेक्षित फळ मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)