Mangal Gochar 2023 : अखेर मंगळ ग्रहाचं कर्क राशीत गोचर, राशीचक्रावर होणार असा परिणाम

| Updated on: May 10, 2023 | 3:00 PM

Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रहाने अखेर चंद्राचं स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश केला आहे. मंगळ ग्रहाच्या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम दिसणार आहे.

Mangal Gochar 2023 : अखेर मंगळ ग्रहाचं कर्क राशीत गोचर, राशीचक्रावर होणार असा परिणाम
मंगळ गोचर
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला नवग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच मंगळाकडे मेष आणि वृश्चिक राशीचं स्वामित्व आहे. मंगळ ग्रहाला पराक्रम, साहस, ऊर्जा, शक्ती यांचा कारक मानलं जातं. जर जातकाच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली नसेल तर मात्र निर्णय घेताना अडचण येते. मंगळाने कर्क राशीत गोचर केलं असून 1 जुलैपर्यंत या राशीत राहणार आहे. मंगळ गोचराचा पृथ्वीतलावर आणि मानवी जीवनावर परिणाम होईल. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळं भोगावी लागू शकतात. चला जाणून घेऊयात मेष ते मीनपर्यंत असलेल्या राशीचक्रावर काय परिणाम होणार

मंगळ गोचर आणि राशी

मेष : या राशीच्या चौथ्या स्थानात मंगळाचं गोचर झालं आहे. जोडीदाराकडून असलेली नाराजी यामुळे दूर होईल. विद्यार्थ्यांना या काळाच चांगले परिणाम दिसून येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होईल. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि आपली उर्जा योग्य ठिकाणी वापरा.

वृषभ : या राशीच्या तिसऱ्या स्थानात मंगळाचं गोचर झालं आहे. त्यामुळे गरज नसलेल्या वस्तू उधार घेऊ नका. तसेच पैशांची बचत करा. नवीन वाहन किंवा जमीन खरेदीचा योग जुळून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मिथुन : या राशीच्या दुसऱ्या स्थानात मंगळ स्थित आहे. धनस्थान असल्याने मंगळाची साथ मिळेल. साहस आणि पराक्रमामुळे काही अशक्य गोष्टी शक्य कराल. कामाच्या ठिकाणी विनाकारण भांडणं करू नका. त्यामुळे तुम्हाला नाहक त्रास होईल. गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कट कारस्थान रचतील पण त्यांना यश मिळणार नाही.

कर्क : या राशींच्या पहिल्या म्हणजेच लग्न भावात मंगळ आला आहे. यामुळे कुटुंबात तणाव वाढू शकतो. घरातील कार्यक्रमात अडचणी येतील. त्यामुळे एकटेपणा जाणवेल. गरजेच्या वस्तूंकडे लक्ष केंद्रीत करा. व्यवसायाच्या दृष्टीने मंगळ गोचर फलदायी नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सिंह : या राशीच्या बाराव्या स्थानात मंगळ गोचर झालं आहे. यामुळे काही आजार बळावण्याची शक्यता आहे. रक्तदाबावर लक्ष ठेवा. जोडीदारासोबत बोलताना सावधपणे बोला. अन्यथा वाद आणखी वाढू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला असेल. बॉस आणि सहकाऱ्यांचं सपोर्ट मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कन्या : या राशीच्या एकदाश भावात मंगळ स्थित आहे. या काळात तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. तसेच आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील. वैवाहिक जीवनात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन ऑफर मिळू शकते. मित्र मंडळीकडून चांगली साथ मिळेल. आई वडिलांसोबत नातं आणखी घट्ट होईल.

तूळ : या राशीच्या दशम स्थानात मंगळ ग्रहाचं आगमन झालं आहे. या काळात काही बदल तुम्हाला दिसतील. कौटुंबिक नाती आणखी घट्ट होतील. मुलांच्या प्रगतीत तुम्हाला वाढ होताना दिसेल. जमीन खरेदीसाठी योग्य काळ आहे. व्यवसायात वृद्धी होईल. आत्मविश्वासाने कामं पूर्ण कराल. विनाकारण कुणाशीही वाद घालू नका.

वृश्चिक : या राशीच्या नवव्या स्थानात मंगळ गोचर झाला आहे. या काळात नोकरी बदल होऊ शकतो. उत्पन्नातही वाढ होईल. विद्यार्थ्यांना या काळात जास्त मेहनत घ्यावी लागेल. अभ्यासाकडे आणखी लक्ष द्यावं लागेल. वडिलांसोबत संबंध खराब होऊ शकतात. कामात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

धनु : मंगळ गोचर या राशीच्या आठव्या स्थानात झाला आहे. या दरम्यान वैवाहित जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक गणित या काळात सुटतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित जमिनीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. मित्रांसोबत चांगला वेळ व्यतित कराल.

मकर : या राशीच्या सातव्या स्थानात मंगळ गोचर केलं आहे. या काळात राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. कारण न्यायालयीन प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रीत करा आणि चर्चांपासून दूर राहा. व्यवसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. मोठी ऑर्डर या काळात मिळू शकते.

कुंभ : या राशीच्या सहाव्या स्थानात मंगळ गोचर झालं आहे. या काळात खर्चात वाढ होऊ शकते. पण आर्थिक स्थिती एकदम खराब होणार नाही. वाईट संगत आणि नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहा.कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

मीन : या राशीच्या पाचव्या स्थानात मंगळ स्थित आहे. मित्रांकडे अडकलेले पैसे मिळू शकतात. या काळात तुम्ही नोकरी बदलू शकता. विदेशवारी करण्याची इच्छा या काळात पूर्ण होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.