Astrology 2023 : जुलै महिन्यात चंद्र 13 वेळा करणार गोचर, कसा परिणाम होणार, जाणून घ्या

| Updated on: Jun 24, 2023 | 4:37 PM

राशीचक्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं अस्तित्व आहे. मनाचा कारक असलेला चंद्र ग्रह सर्वात वेगाने राशीभ्रमण करतो. त्यामुळे राशीचक्रावर झटपट परिणाम दिसून येतो.

Astrology 2023 : जुलै महिन्यात चंद्र 13 वेळा करणार गोचर, कसा परिणाम होणार, जाणून घ्या
Astrology 2023 : जुलै महिन्यात चंद्राचं राशी भ्रमण आणि शुभ अशुभ योगाची स्थितीबाबत जाणून घ्या
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा वेगवेगळा आहे. चंद्र सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. सव्वा दोन दिवसानंतर चंद्र हा राशी बदल करत असतो. चंद्राला मनाचा कारक ग्रह असं संबोधलं जातं. चंद्राच्या स्थितीवरून जातकाच्या कुंडलीची मांडणी केली जाते. भारतात ज्योतिष भविष्यकाळ चंद्र राशीच्या आधारावर केलं जातं. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे. वृषभ राशीत उच्च, तर वृश्चिक राशीत निचेचा मानला जातो. चंद्र आपल्या तिथीनुसार कला बदलत असतो. शुक्ल पक्षात चंद्राची कला वाढत जाते आणि पंधरा दिवसानंतर पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा असते. त्यानंतर चंद्र क्षीण होत जातो आणि कृष्ण पक्षात पंधरा दिवसानंतर गायब होतो. त्या तिथीला अमावास्य असं म्हंटलं जातं.

चंद्राचे मित्र आणि शत्रू ग्रह

ज्योतिषशास्त्रात चंद्राचे सूर्य आणि बुधासोबत मित्रत्वाचे संबंध आहेत. तर राहु आणि केतु हे शत्रू ग्रह आहेत. तर मंगळ, गुरु, शुक्र आणि शनिसोबत सम व्यवहार आहेत. चंद्र पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानात चांगले परिणाम देतो. इतर स्थानात संमिश्र प्रतिसाद देतो.

चंद्र ग्रहाचं गोचर

  • 2 जुलै 2023, रविवार : चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी प्रवेश करेल.
  • 4 जुलै 2023, मंगळवार : चंद्र धनु राशीतून मकर राशीत दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी प्रवेश करेल.
  • 6 जुलै 2023, गुरुवार : चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी प्रवेश करेल.कुंभ राशीत शनि असल्याने विष योग तयार होणार आहे.
  • 8 जुलै 2023, शनिवार :चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल.
  • 10 जुलै 2023, सोमवार :चंद्र मीन राशीतून मेष राशीत संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी प्रवेश करेल. मेष राशीत राहु आणि गुरु हे दोन ग्रह आहेत. त्यामुळे गुरुच्या सान्निध्यात आल्याने गजकेसरी योग आहे. दुसरीकडे, राहु असल्याने अशुभ ग्रह योग असणार आहे.
  • 13 जुलै 2023, गुरुवार :चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल.
  • 15 जुलै 2023, शनिवार :चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी प्रवेश करेल. मिथुन राशीत बुध आणि सूर्य ग्रहाशी युती होईल.
  • 17 जुलै 2023, सोमवार :चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत रात्री 10 वाजून 31 मिनिटांनी प्रवेश करेल. कर्क राशीत सूर्य गोचर केल्याने पुन्हा सूर्यासोबत युती होईल.
  • 20 जुलै 2023, गुरुवार :चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी प्रवेश करेल. मंगळ ग्रहासोबत युतीमुळे लक्ष्मी योग, तर शुक्रासोबत युतीमुळे कलात्मक योग तयार होणार आहे.
  • 22 जुलै 2023, शनिवार :चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करेल.
  • 25 जुलै 2023, मंगळवार :चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी प्रवेश करेल. केतुसोबत युतीमुळे ग्रहण असणार आहे.
  • 27 जुलै 2023, गुरुवार :चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी प्रवेश करेल.
  • 29 जुलै 2023, शनिवार :चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत रात्री 11 वाजून 34 मिनिटांनी प्रवेश करेल.

चंद्राची कृपा मिळवण्यासाठी उपाय

  • कुंडलीत चंद्राची स्थिती चांगली करण्यासाठी नियमितपणे सोमवारी व्रत करावे.
  • रोज संध्याकाळी चंद्राच्या बीज मंत्राचा जप करावा. || ॐ सों सोमाय नम: || किंवा ॥ ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम: ॥ या मंत्राचा जप करावा.
  • गरीब आणि गरजूंना दुधाचं दान करावं. तसेच घरात मोठं घड्याळ ठेवू नये.
  • जातकांनी आपल्या घरी मोरपिसे ठेवावीत, तसेच बाहेरील व्यक्तीकडून चांदीच्या वस्तू स्वीकारू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)