ऑगस्ट महिन्यात चंद्राची स्थिती कशी असेल? प्रत्येक सव्वा दोन दिवसांनी काय घडणार? वाचा
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीननंतर राशी बदल करत असतो. त्यात चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. दर सव्वा दोन दिवसांनी चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ऑगस्ट महिन्यात चंद्र 14 वेळा राशी बदल करणार आहे. त्यात इतर ग्रहांची स्थितीही महत्त्वाची ठरणार आहे. राहु-केतु, शनि आणि गुरु हे ग्रह सोडले तर इतर ग्रहांची हालचाल पाहायला मिळणार आहे.
कोणते ग्रह कधी राशी बदल करणार?
सूर्य एका राशीत महिनाभरासाठी ठाण मांडून बसतो. त्यानंतर राशी बदल करतो. आता 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह सध्या सिंह राशीत वक्री अवस्थेत आहे. अशा स्थितीत शुक्र 7 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल.
17 ऑगस्टलाा मंगळ ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह बुध गणला जातो.बुध सिंह राशीत 25 जुलैला प्रवेश करणार आहे. याच राशीत 1 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
कशी असेल चंद्राची स्थिती
- 1 ऑगस्टला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मध्यरात्री 12.15 मिनिटांनी या राशीत प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्न येत नाही.
- 2 ऑगस्टला चंद्र मकर राशीतून कुभ राशीत प्रवेश करेल. रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत शनिदेव असल्याने सव्वा दोन दिवस जातकांना विषयोग अनुभवावा लागेल.
- 4 ऑगस्टला चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. रात्री 11 वाजून 17 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्न नाही.
- 7 ऑगस्टला चंद्र मीन राशीतून मेष राशीत्र दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत राहु आणि गुरुची साथ मिळणार आहे. त्रिग्रही योगासोबत एक शुभ आणि दोन अशुभ योग तयार होणार आहे. राहुसोबत युतीमुळे ग्रहण योग, गुरुसोबत युतीमुळे गजकेसरी योग, तर गुरु आणि राहुच्या युतीमुळे चांडाळ योग सुरुच आहे.
- 9 ऑगस्टला चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. वृषभ राशीत कोणताच ग्रह नसल्याने थेट असा योग जुळून येणार नाही.
- 11 ऑगस्टला चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत संध्याकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी प्रवेश करेल. या मिथुन राशीतही कोणताच ग्रह नसल्याने युतीचा प्रश्नच येत नाही.
- 14 ऑगस्टला चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत सूर्य असल्याने योग जुळून येईल.
- 16 ऑगस्टला चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल. सिंह राशीत सूर्य, बुध आणि मंगळासोबत युती होईल. सूर्यही 17 ऑगस्टला सिंह राशीत येणार आहेत. त्यामुळे चतुर्ग्रही योग जुळून येईल. मंगळासोबत युतीमुळे लक्ष्मी योग जुळून येईल.
- 19 ऑगस्टला चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश सकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी प्रवेश करेल. याच शुक्राची भेट होणार आहे. शुक्र 7 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी कन्या राशीत आलेला असेल. त्यामुळे सव्वा दोन दिवस कलात्मक योग जुळून येईल.
- 21 ऑगस्टला चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत केतु ठाण मांडून असल्याने दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे ग्रहण योग जुळून येईल. ज्योतिषशास्त्रात हा अशुभ योग गणला जातो.
- 24 ऑगस्ट चंद्र रात्री 2 वाजून 54 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नाही. त्यामुळे युती आघाडीचा प्रश्नच नाही.
- 26 ऑगस्टला चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीतही कोणताच ग्रह नसेल. त्यामुळे योग जुळून येणार नाही.
- 28 ऑगस्टला चंद्र धनु राशीतून मकर राशीत सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीतही ग्रह नसल्याने युती आघाडी होणार नाही.
- 30 ऑगस्टला चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत शनिदेव असल्याने युती होईल. या युतीमुळे विष योग जुळून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)