Horoscope 2023 : ग्रहांच्या उलथापालथीत चंद्र करणार 14 वेळा राशी परिवर्तन, जाणून गोचर आणि शुभ अशुभ योग
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीच सव्वा दोन दिवसात बदल करतो. त्यामुळे शुभ अशुभ योग तयार होतात. ऑक्टोबर महिन्यात चंद्र हा 14 वेळा राशी बदल करणार आहे. त्यामुळे राशीचक्रात कोणता ग्रह कोणत्या राशीत विराजमान आहे यावरून युती आघाडी ठरणार आहे. मंगळ ग्रह तूळ राशीत असणार आहे.सूर्य 18 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत असेल. त्यानंतर तूळ राशीत प्रवेश करेल. बुध ग्रह 1 ऑक्टोबरला कन्या राशीत आणि त्यानंतर 19 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्र 2 ऑक्टोबरला सिंह राशीत गोचर करेल. तर राहु आणि केतु 30 ऑक्टोबरला राशीबदल करतील. या ग्रहांची स्थिती आणि चंद्राच्या गोचरामुळे राशी चक्रावर परिणाम दिसून येईल.
चंद्र गोचर आणि शुभ अशुभ युती
- 3 ऑक्टोबरला चंद्र ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. रात्री 12 वाजून 14 मिनिटांनी या राशीत प्रवेश करेल. या राशीत ऑक्टोबर महिन्यात कोणताच ग्रह नाही. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती नाही.
- 5 ऑक्टोबरला चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी या राशीत जाईल. या राशीतही कोणताच ग्रह नाही. मात्र चंद्राचा प्रभाव अधिक असेल.
- 7 ऑक्टोबरला चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी प्रवेश करेल. कर्क राशीतही कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्नच नाही.
- 10 ऑक्टोबरला कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी या राशीत प्रवेश करेल. या राशीत शुक्र असल्याने कलात्मक योग तयार होईल. सव्वा दोन दिवस हा योग असेल.
- 12 ऑक्टोबरला सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी प्रवेश करेल. सूर्य आणि बुधासोबत युती होईल.
- 15 ऑक्टोबरला कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी प्रवेश करेल. मंगळ आणि केतु ग्रह तूळ राशीत असणार आहे. या दोन ग्रहांमुळे अंगारक योग तयार असेल. दुसरीकडे चंद्राचं आगमन होताच ग्रहण योग लागणार आहे. मंगळ आणि चंद्राची युती लक्ष्मी योग तयार करेल.
- 17 ऑक्टोबरला तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. दुपारी 2 वाजून 19 मिनिटांनी प्रवेश करेल. वृश्चिक राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडी होणार नाही.
- 19 ऑक्टोबरला वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. रात्री 9 वाजून 03 मिनिटांनी प्रवेश करेल. धनु राशीतही चंद्र एकमेव ग्रह असणार आहे.
- 22 ऑक्टोबरला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. रात्री 1 वाजून 38 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीला सातेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे सव्वा दोन दिवस चंद्राचा प्रभाव दिसेल.
- 24 ऑक्टोबरला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. सकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत शनिदेव असल्याने विष योग तयार होईल.
- 26 ऑक्टोबरला कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल. मीन राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्न उद्भवत नाही.
- 28 ऑक्टोबरला मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी प्रवेश करेल. मेष राशीत प्रवेश करताच राहु आणि गुरुसोबत युती होईल. राहुसोबत युतीमुळे ग्रहण योग, तर गुरुसोबत युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल.
- 30 ऑक्टोबरला मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. सकाळी 10 वाजून 28 मिनिटांनी प्रवेश करेल. याच दिवशी राहु आणि केतु शीबदल करतील. राहु मीन राशीत, तर केतु कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे वृषभ राशीत चंद्राच्या युतीचा प्रश्न येत नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)